शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील आम्रवृक्षांची कत्तल

By admin | Updated: June 14, 2014 01:52 IST

तळोधी राज्य महामार्गावर असलेल्या आम्रवृक्षांकडे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने साफ दुर्लक्ष केले आहे.

घनश्याम नवघडे नागभीडनागभीड - तळोधी राज्य महामार्गावर असलेल्या आम्रवृक्षांकडे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने साफ दुर्लक्ष केले आहे. याचाच परिपाक म्हणून या आम्रवृक्षांची एकापाठोपाठ एक अशी कत्तल सुरु आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने नागभीड - तळोधी राज्य महामार्गावर सावरगावपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा आम्रवृक्षांची मोठ्या उत्साहात लागवड केली. काही वर्षांंनंतर ही आम्रवृक्ष चांगलीच बहरली. आंब्यांची ही झाडे मोठी झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याच्या संवर्धनाकडे लक्ष देणे बंद केले. त्यामुळे आता या बहरलेल्या वृक्षांची खुलेआम कत्तल केली जात आहे. जनकापूरपासून सावरगावपर्यंतच्या झाडांची तोड करण्यात आल्याचे दिसून येते. जनकापूरपासून सावरगावपर्यंतच्या अंतरावर किमना शंभर झाडे आहेत. मात्र कत्तलीमुळे ती उजाड झाली आहेत तर मोहित करणारे रस्तेही ओसाड झाल्याचे दिसून येते.एकिकडे शासन वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपयांची उधळण करीत असले तरी त्याची फलनिष्पत्ती शुन्य आहे. शासनाचा हा खर्च फूकट जात आहे. आणि शासनाचाच एक भाग असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यांच्या अखत्यारीत असलेली झाडे राखता येऊ नयेत याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.नागभीड - तळोधी- सावरगाव या मार्गावरील झाडांचे निरीक्षण केल्यास अनेक झाड्याच्या मोठमोठ्या फांद्या अनेकांनी लंपास केल्याचे दिसून येत आहे.काही वेळेस हे चोरटे या झाडांच्या सालींमध्ये विशिष्ट द्रव्य टाकून ते झाडच सुकवतात आणि नंतर त्याची तोड करतात, अशी माहिती काही जाणकारांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. अनेकदा जिवंत झाडावरच्या फांद्यावरच घाव घालत असल्याची माहिती आहे. वास्तविक या झाडांचे जतन व देखभाल करण्याची जबाबदारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. पण हा विभाग आपली जबाबदारी पार विसरत गेल्याचे एकंदर स्थितीवरुन दिसून येते. या झाडांना किड लागू नये म्हणून गेरु, चुणा लावण्याचाही सार्वजनिक बांधकाम विभागाला विसर पडत चालला आहे. वरिष्ठ कार्यालयाने या बाबीची गंभीर दखल घेण्याची गरज आहे.