शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपूनही अनेकांनी नाही घेतला लसीचा दुसरा डोस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:00 IST

जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात झाली. प्रारंभी गैरसमजांमुळे लस घेणाऱ्यांची संख्या कमी होती. आरोग्य विभागाने सातत्याने जागृतीवर भर दिल्याने डोस घेण्यासाठी केंद्रांवर गर्दी होत आहे. केंद्र शासनाकडून सुरुवातीला राज्याला डोस कमी देत होती. त्याचाही परिणाम लसीकरणाच्या व्याप्तीवर झाला. बºयाच केंद्रांवर लस उपलब्ध होत नसल्याने नागरिक आपल्या पावली परत जात होते.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाविरुद्ध प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी जिल्ह्यातील आठ लाखांहून जास्त नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. मात्र, यातील अनेकांनी मुदत संपूनही दुसरा डोस घेण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आरोग्य विभागाने दोनही डोसचे महत्त्व पटवून देण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात जनजागृतीवर भर देणे सुरू केले आहे.जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात झाली. प्रारंभी गैरसमजांमुळे लस घेणाऱ्यांची संख्या कमी होती. आरोग्य विभागाने सातत्याने जागृतीवर भर दिल्याने डोस घेण्यासाठी केंद्रांवर गर्दी होत आहे. केंद्र शासनाकडून सुरुवातीला राज्याला डोस कमी देत होती. त्याचाही परिणाम लसीकरणाच्या व्याप्तीवर झाला. बºयाच केंद्रांवर लस उपलब्ध होत नसल्याने नागरिक आपल्या पावली परत जात होते. आता तर केंद्रांचीही संख्या ४०० पेक्षा जास्त झाली. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसीबाबतही काही गैरसमज पसरविण्यात आले होते. हा प्रकार जिल्हा प्रशासनाच्या लक्षात येताच लसीकरण केंद्रांवर जागृतीचे बॅनर लावणे, घरोघरी भेटी देऊन लसीचे महत्त्व समजावून सांगणे सुरू झाले. याचा सकारात्मक परिणाम झाला. मात्र, पहिला डोस घेतल्यानंतर मुदत संपूनही केवळ हलगर्जीपणामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

दुसरा डोस घेणेही तितकेच आवश्यकदोन्ही कोविड डोस संसर्गापासून बचाव करतात. प्रथम डोस प्रभावीच आहे. पण, दुसरा डोस रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत करतो. दुसऱ्या डोस शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीतील मेमरी-बी पेशी निर्माण होतात. हा पांढऱ्या रक्त पेशीचा एक प्रकार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांपासून दूर राहावे, आरोग्य विभागाचा सल्ला स्वीकारावा.

नेमकी अडचण काय ?

दुसरा डोस घेतल्यास आतील रिसेप्टर्स व्हायरसने शरीरात प्रवेश करताच सिस्टमला सतर्क करतात व कोविड संक्रमणापासून वाचवतात, अशी माहिती आरोग्य यंत्रणेकडून सतत सांगितली जात आहे. पण, निष्काळजीपणा व केंद्रात जाऊन एक-दोनदा परत आल्याने आलेली नकारात्मकता, आदी कारणे दुसरा डोस घेण्यास अडचणी निर्माण करीत आहेत.

पहिला घेतल्यास दुसरा डोस मिळतोचदुसरी लस वेळेत मिळाली नाही तरी प्रकृतीवर काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी त्याची काळजी करू नये. पण दुसरी लस घेणे अत्यंत गरजेचे आहे. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस मिळतोच, असा दावा प्रशासनाने केला आहे. नागरिकांनी स्वत: व कुटूंबाच्या आरोग्यासाठी कोणत्याही स्थितीत दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या