शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

मंगेश पाडगावकरांनी बरसविल्या होत्या काव्यधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 00:54 IST

मराठी साहित्य क्षेत्रात मोठे नाव असलेले कवी मंगेश पाडगावकर हे चंद्रपूरला १६ जून २००८ ला आले होते.

आठवणींना उजाळा : चंद्रपुरात झाला होता कार्यक्रमबल्लारपूर : मराठी साहित्य क्षेत्रात मोठे नाव असलेले कवी मंगेश पाडगावकर हे चंद्रपूरला १६ जून २००८ ला आले होते. त्यांच्या काव्यगायनाचा कार्यक्रम प्रियदर्शनी सभागृहात स्नेहांकितच्या वतीने झाला होता. त्यांच्या बहारदार व चौफेर रंगाच्या कवितांनी श्रोत्यांना मनमुराद आनंद दिला होता. पाडगावकर हे कुणा एका खास विषयाचे कवी म्हणून राहिले नाहीत. त्यांनी काव्यातील सर्वच प्रकार हाताळले. राजकारण, समाजकारण, निसर्ग, बाल काव्य, व्यंग, विनोद या सर्वच काव्यप्रकारात त्यांचा संचार होता. त्याचा प्रत्यय चंद्रपुरातील त्यांच्या काव्य गायनातून आला.समाजातील चांगल्या-वाईट प्रवृत्तीवर त्यांनी बेधडकपणे काव्य रचले. आणि तेवढ्याच ताकदीने ते रसिकांपुढे मांडले. प्रसन्न व्यक्तिमत्वाचे ते धनी होते. रसिकांना, त्यांच्या काव्य गायन कार्यक्रमातून त्यांची प्रसन्नता ठळकपणे अनुभवायला मिळायची. चंद्रपुरात भाऊ मराठे यांनी घेतलेल्या मुलाखतीत मंगेश पाडगावकर हे नवीन कविंना मार्गदर्शन करीत म्हणाले होते की ग्रामीण कवींचा जगण्याचा अनुभव वेगळा व शहरी संस्कृतीत वाढणाऱ्या कवीचा अनुभव वेगळा असला तरी त्या-त्या ठिकाणची अनुभवाची समृद्धी वाढवावी आणि नवोदित कवींनी आशयघन कविता लिहावी. त्या लिहिल्या जात आहेत व मनाला भिडणाऱ्याही आहेत. त्यांच्या विविध जाणिवा कविंतामध्ये आहेत. बल्लारपूर येथील कवी प्रा. विजय सोरते यांनी मंगेश पाडगावकर यांच्या काव्यावर पीएचडी मिळविली आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय ‘कविवर्य मंगेश पाडगावकर आणि कविवर्य सुरेश भट यांच्या काव्यवाड्:मयाचा तैलीक अभ्यास’ हा होता. या निमित्ताने प्रा. सोरते यांचा पाडगावकर यांच्याशी प्रत्यक्ष मुलाखतीचा प्रसंग आला आहे. त्यांनीही आपल्या आठवणींना उजाळा दिला. या कविवर्याला भावपूर्ण श्रद्धांजली! (तालुका प्रतिनिधी)