महिला दिन : पोलीस महासंचालकांनी दिली अनोखी भेटराजकुमार चुनारकर खडसंगीपोलीस ठाण्यातील दैनंदिन कामकाजात महत्वाची समजली जाणारी कामगिरी म्हणजे स्टेशन डायरी अंमलदार. या महत्वाच्या स्टेशन डायरीवर काम करण्यााठी पोलीस विभागाने नायक हवालदार तथा स्टेशन डायरी अंमलदार यांची नियुक्ती केली आहे. मात्र मुंबई पोलीस मुख्यालयाचे महासंचालक प्रविण दीक्षीत यांनी काढलेल्या फतव्यामुळे चिमूर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस शिपाई मंगला यांना एक दिवसासाठी का होईना पण ‘वन डे ’ स्टेशन डायरी अंमलदार होण्याचा मान मिळाला.सर्वच क्षेत्रात महिलांचे स्थान वाढले आहे. पोलीस खात्यातही महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणावर पुरूष पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. पोलीस खात्यातील महिलांचे प्रमाण वाढावे आणि कार्यक्षमता वाढावी यासाठी नवनवे प्रयोग होत आहेत. याच हेतून महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस महासंचालक प्रणीण दीक्षात यांनी ८ मार्च या महिला दिनी सर्व पोलीस ठाण्यात स्टेशन डायरी अंमलदार म्हणून महिलांना जबाबदारी देण्याचे आदेश काढले. स्टेशन डायरीचे काम कुशल व अनुभवी असलेल्या नायक हवालदाराकडे असते. डायरी अंमलदार पदावर पोहचण्यासाठी किमान १० ते १५ वर्षांच्या सेवेचा आणि कामातील कुशलतेचा मुद्दा महत्वाचा असतो. पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार मंळवारी या ठाण्यातील स्टेशन डायरी अंमलदार होण्याची संधी मंगला मेश्राम यांना मिळाली. चार वर्षांपूर्वीच त्या खात्यात रूजू झाल्या आहेत. एक दिवसासाठी का होईना पण या पदावर काम करण्याची संधी मिळाली.
मंगला बनली ‘वन डे’ स्टेशन डायरी अंमलदार
By admin | Updated: March 9, 2016 01:58 IST