शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

मानेमोहाडीच्या कार्तिकचा अपघात नसून हत्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:30 IST

चिमूर : तालुक्यातील मानेमोहाडी येथील १६ वर्षीय मुलगा तुलसी उर्फ कार्तिक भगवान जीवतोडे याला २० ऑगस्टला मानेमोहाडी फाट्यावर बेदम ...

चिमूर : तालुक्यातील मानेमोहाडी येथील १६ वर्षीय मुलगा तुलसी उर्फ कार्तिक भगवान जीवतोडे याला २० ऑगस्टला मानेमोहाडी फाट्यावर बेदम मारहाण करण्यात आली. ज्यामुळे त्याचा चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र मारेकऱ्यांनी अपघात झाल्याचा बनाव केला. हा अपघात नसून हत्याच असल्याचा आरोप करीत आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेने चिमूर पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

२० ऑगस्टला मामाच्या गावाला जाण्याकरिता तुलसी उर्फ कार्तिक मानेमोहाडी फाट्यावरील बस स्टाॅपवर थांबला होता. तेव्हा आरोपीने अचानक येऊन त्याला मारहाण करायला सुरुवात केली. ज्यामुळे स्वतःला वाचविण्याकरिता कार्तिक धावत सुटला. वाटेत भेटलेल्या ट्रॅक्टरचालकाला मला वाचवा, अशी विनंती केली. त्यामुळे चालकाने कार्तिकला ट्रॅक्टरवर घेतले. त्यानंतर आरोपीने तिथे येऊन ट्रॅक्टरचालकास धमकावून कार्तिकला ट्रॅक्टरवरून उतरून मारहाण केली. ट्रॅक्टर \चालक जिवाच्या भीतीने तिथून निघून गेला.

त्यादरम्यान गावातील दोघे गावाकडे येत असताना आरोपी एकाला मारहाण करताना दिसला. त्यामुळे त्यांनी धाव घेतली असता आरोपी पळून गेला. या दोघांनी जखमी कार्तिकला प्राथमिक आरोग्य केंद्र मासळ येथे दाखल केले. दरम्यान, आरोपीने कार्तिकच्या घरी जाऊन आईला कार्तिकचा अपघात झाल्याचे सांगून आरोग्य केंद्रात आणले. मात्र तिथे ट्रक्टरचालकाने आरोपीने कार्तिकला बेदम मारल्याचे सांगितले. पुढे उपचारादरम्यान कार्तिकचा मृत्यू झाला. कार्तिकची हत्याच असून, आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटनेचे तालुका अध्यक्ष रंजित सावसाकडे, विशाल नन्नावरे, निका श्रीरामे, प्रा. अतुल वाघमारे, शंकर नन्नावरे, प्रवीण जीवतोडे, संदीप धारणे, निखिल जीवतोडे व मुलाचे आई, वडील यांनी केली आहे.