शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरात मनसेची गांधीगिरी

By admin | Updated: August 23, 2016 01:16 IST

चिमूर तालुक्यातील जनसामान्यांच्या मागण्यासह चैती तुकूम येथील अवैध उत्खनन व चिमूर क्रांती

चिमूर : चिमूर तालुक्यातील जनसामान्यांच्या मागण्यासह चैती तुकूम येथील अवैध उत्खनन व चिमूर क्रांती जिल्ह्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चिमूरच्या वतीने येथील तहसील कार्यालयापुढे गांधीगिरी करत सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्याकडून सर्वसामान्यांना नाहक त्रास दिल्या जातो. हा त्रास दूर करून शासनाचा महसूल बुडवणाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, चैती तुकूम येथे अवैध उत्खनन करून शासकीय महसूल बुडविल्यामुळे रॉयट ब्लु रिसोर्टच्या संचालकावर शासकीय कारवाई न करता त्याची पाठराखण करणारे नायब तहसीलदार विनायक मगर यांच्यावर निलंबणाची कारवाई करून विभागीय चौकशी करावी, तहसील कार्यालयाचे काम पारदर्शक होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, चिमूर वडाळा येथील लेआऊटधारकांनी नियमांचा भंग करून ओपन स्पेसची बेकायदा विक्री केली. या लेआऊटधारकावर कारवाई करण्यात यावी, तत्कालिन तहसीलदार निलेश काळे यांच्या कार्यकाळात तयार करण्यात आलेले बोगस अंत्योदयश बीपीएल कार्ड रद्द करून चौकशी करावी, शेती व जमिनी बाबतचे फेरफार प्रकरण तातडीने पूर्ण करावे, चिमूर नगर परिषदेत विविध पदावर करण्यात आलेल्या बोगस भरतीची विभागीय चौकशी करण्यात यावी या मागण्यासह चिमूर क्रांती जिल्हा निर्मिती संदर्भात शासनस्तरावर शिफारस करण्यात यावी, या मागण्यांसाठी मनसेने गांधीगिरी करीत तहसील कार्यालयापुढे आमरण उपोषण सुरू केले आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता मनसेचे चिमूर शहरध्यक्ष महेंद्र तोटावार व रमाकांत मेहरकुरे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनासाठी चिमूर विधानसभेचे अध्यक्ष अरविंद सांदेकर, जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, तालुकाध्यक्ष प्रशांत कोल्हे, नितीन लोणारे, उपाध्यक्ष संजय वाकडे, तुषार हजारे यांच्या उपस्थितीत आमरण उपोषण सुरू असून मागण्या न सोडविल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा अरविंद सांदेकर व दिलीप रामेडवार यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)