शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

उथळपेठ येथे रोजगार हमी योजनेच्या कामात गैरव्यवहार

By admin | Updated: July 21, 2015 01:05 IST

येथून जवळच असलेल्या मूल तालुक्यातील उथळपेठ येथील रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या पांदण रस्त्याच्या

भेजगाव : येथून जवळच असलेल्या मूल तालुक्यातील उथळपेठ येथील रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या पांदण रस्त्याच्या कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी संवर्ग विकास अधिकारी व सभापती पेंदाम यांच्याकडे करुन चौकशीची मागणी केली आहे.आर्थिक वर्षे २०१४-१५ , २०१५-१६ या वर्षात उथळपेठ येथील आत्माराम वाढई ते भागरती पांदण रस्ता, महादेव चिचघरे ते भाऊजी चिचघरे पांदण रस्ता, भगवान वाढई ते भागरती, मामा तलाव खोलीकरण आदी कामे करण्यात आली. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावातील मजुरांना काम तर कामाच्या माध्यमातून गावाचा विकास साधण्याच्या उद्देशाने दरवर्षी या योजनेअंतर्गत कामे केली जातात. मात्र अधिकारी व रोजगार सेवक यांच्या भ्रष्ट धोरणामुळे या योजनेला गालबोट लागल्याचे चित्र आहे.उथळपेठ येथील झालेल्या कामावर प्रत्यक्ष गेलेल्या मजुरांना कमी मोबदला तर कामावर कधी मजूर गेलेच नाही, अशा मजुरांच्या खात्यात अधिक मजुरी जमा करण्यात आली. कामांवर न आलेल्या मजुरात रोजगार सेवकांचे नातेवाईक असून रोजगार सेवक व ग्रामसेवक यांच्या संगनमताने आर्थिक व्यवहार झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.विशेष म्हणजे रोजगार सेवकांनी वृद्धपकाळात योजनेत लाभार्थी असलेल्या लाभार्थ्यांनाही कामावर आल्याचे दाखवून तर काही मृत व्यक्तींनाही कामावर दाखविले. त्यांच्या खात्यात मजुरी जमा केली, याची माहिती ग्रामस्थांनी इंटरनेच्या साह्याने उघड केली.उथळपेठ येथील रोजगार हमी योजनेच्या देयकाबाबत चौकशी करुन संबंधीतावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सभापती पेंदाम यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. (वार्ताहर)