शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मलई खाल्ली ग्रामपंचायतीने, शिक्षा मात्र एकट्या ग्रामरोजगार सेवकाला

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भो) येथील झालेल्या रोहयोच्या कामातील भ्रष्टाचाराची घटना शिवसेना व कष्टकरी ...

रोहयोतील भ्रष्टाचार : गटविकास अधिकाऱ्याकडून ग्रामसेवक व सरपंचाला वाचविण्याचे प्रयत्नब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भो) येथील झालेल्या रोहयोच्या कामातील भ्रष्टाचाराची घटना शिवसेना व कष्टकरी महिलांच्या पुढाकाराने उघडकीस आली. यात भ्रष्टाचाराचे मुख्य सूत्रधार असलेले ग्रामसेवक, सरपंच व ग्रामरोजगार सेवक हे आहेत. ग्रामपंचायतीने २५४ बोगस मजुरांची नावे दाखवून २ लाख ३४ हजार ८४४ रुपयांचा घोटाळा केला. मात्र गटविकास अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात सरपंच व ग्रामसेवकाला वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा असून त्यामुळे या प्रकरणात केवळ ग्रामरोजगार सेवक अडकणार आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भो.) ग्रामपंचायती येथे बेरोजगारांना काम मिळावे, या उद्देशाने मनरेगामार्फत गावातील गरीब कष्टकरी मजुरांना काम देण्यात आले. परंतु सदर कामात मजुरी बरोबर मिळत नसून भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार शिवसेना व कष्टकरी महिलांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली. गटविकास अधिकाऱ्यांनी या कामाची चौकशी केली असता, २५४ बोगस मजुरांची नावे आढळून आली. तसेच दोन लाख ६४ हजार ८४४ रुपयांचा भ्रष्टाचार सात आठवड्याच्या काळात झाल्याचे चौकशीत उघड झाले. या कामात सरपंच, ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक दोषी असल्याचे आढळून येत असले तरी गटविकास अधिकारी प्रकाश तोडेवार यांनी या भ्रष्टाचाराला ग्रामरोजगार सेवकच जबाबदार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र ग्रामरोजगार सेवकाला ग्रामसेवक व सरपंच यांच्या आदेशानुसार काम करावे लागते, असे असतानाही केवळ ग्रामरोजगार सेवक दोषी कसा, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. हजेरीबुकावर सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांची स्वाक्षरी आवश्यक असते. सरपंच व ग्रामसेवकाने हजेरी बुक न वाचता झोपेतच स्वाक्षरी केली काय? असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सदर प्रकरणात झालेल्या भ्रष्टाचाराची मलाई खाणारे अनेकजण असले तरी शिक्षेच्या वेळी मात्र यातील अनेक भ्रष्टाचारी ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेत आहेत. मनरेगाच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या सरपंच व ग्रामसेवकाला गटविकास अधिकारी प्रकाश तोडेवार यांचे अभय मिळत असून त्यांना वाचविण्यासाठी गटविकास अधिकारी शर्तीचे प्रयत्न करीत असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे. या भ्रष्टाचारात केवळ ग्रामरोजगार सेवकालाच आरोपी न करता जे अधिकारी व पदाधिकारी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, व कष्टकरी गरीब महिलांना न्याय मिळवून द्यावा व हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याने सदर प्रकरणाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष द्यावे, अशी मागणी पिंपळगाव (भो.) येथील नागरिकांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)