शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मलेशियात पटकावली दोन सुवर्ण पदके

By admin | Updated: May 18, 2017 01:16 IST

येथील विनय बबन बोढे यांनी १४, १५ मे रोजी मलेशियाची राजधानी क्वालालांपूर येथील चेरास स्टेडियममध्ये

‘मदर्स डे’ आईला समर्पित : घुग्घुसच्या विनय बोढे यांचे रेल्वे स्टेशनवर जंगी स्वागत लोकमत न्यूज नेटवर्क घुग्घुस : येथील विनय बबन बोढे यांनी १४, १५ मे रोजी मलेशियाची राजधानी क्वालालांपूर येथील चेरास स्टेडियममध्ये आयोजित १८ व्या माईलो इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत दोन सुवर्ण पदके पटकाविलीे. ते सुवर्ण पदकांसह मायदेशी परतल्यावर बुधवारी त्याचे चंद्रपूरला आगमन होताच रेल्वे स्टेशनवर जंगी स्वागत करण्यात आले. त्याने ही सुवर्ण पदके ‘मदर्स डे’च्या दिवशी आपल्या आईच्या चरणी समर्पित केली. मलेशियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत जगभरातील २० देशांमधील १ हजार ५०० कराटे स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील विनय बोढे यांनी काता प्रकारात उपांत्य फेरीमध्ये मलेशियाच्या एम. डी. रफिक याला ५-० गुणांनी पराभूत केले. विनय बोढे यांनी अंतिम फेरीमध्ये े इंडोनेशियातील च्यारेंन फैझानीला ४-१ गुणांनी मागे टाकत सुवर्ण पदक प्राप्त केले. कुमिते प्रकारात उपांत्य फेरीमध्ये मलेशियाच्या फैझुल इस्लाम याला चुरशीच्या सामन्यात ६-३ च्या फरकाने आणि अंतिम सामन्यात बांगलादेशाच्या दीन इस्लामी याला नॉकआउट करून तिरंगा फडकविला. याद्वारे त्यांनी भारतासाठी आणखी एक सुवर्ण पदक प्राप्त केले. विनय यांनी ही पदके ‘मदर्स डे’च्या दिवशी जिंकली. त्याकरिता त्यांनी आपली पदके आईला समर्पित केली. त्यांचे चंद्रपूर रेल्वे स्टेशनवर बुधवारी दुपारी आगमन होताच जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा घुग्घुस शहर अध्यक्ष विवेक बोढे, विनोद चौधरी, ग्रा.प. सदस्य साजन गोहणे, वैशाली ढवस, सुचिता लुटे, सुषमा सावे तसेच घुग्घुसमधील कराटेपटू व ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले. यावेळी घुग्घुसचे अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. त्याचे घुग्घुसमध्ये आगमन झाल्यावर घुग्घुस शहरवासीयांतर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली. भारताला तीन सुवर्ण पदके भारताला एकूण तीन सुवर्ण पदके प्राप्त झाली असून त्यात विनयनच्या दोन पदकांचा समावेश आहे. २०११ मध्ये जपान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत विनय बोढे याने कांस्य पदक केले होते. त्याच्या मलेशियातील कामगिरीमुळे घुग्गुस, चंद्रपूर, वणी येथील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे.