शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त सीमावर्ती गावात मलेरियाचा कोप

By admin | Updated: October 2, 2015 05:49 IST

जिवती तालुक्यातील वादग्रस्त सीमावर्ती गावांमध्ये सध्या मलेरियाचा कोप सुरू आहे. महाराष्ट्र सरकार आधीच या गावांवर कोपली

संघरक्षित तावाडे ल्ल जिवतीजिवती तालुक्यातील वादग्रस्त सीमावर्ती गावांमध्ये सध्या मलेरियाचा कोप सुरू आहे. महाराष्ट्र सरकार आधीच या गावांवर कोपली असताना हे नवे संकट गोरगरीबांच्या जिवावर उठले आहे. महाराष्ट्र- तेलंगाणा या दोन राज्याच्या कचाट्यात अडकलेल्या कोटा, शंकरलोधी, मुकदमगुडा व परमडोली या चारही गाववत हिवतापाने कहर घातला आहे. केवळ कहरच नाही तर या आठवड्यात एकूण चार जणांचा बळी गेला आहे.महाराष्ट्र-तेलंगाणा या दोन राज्याच्या सीमावादात जिवती तालुक्यातील १४ गावे भरडली जात आहे. विकासाच्या दृष्टीने ही गावे उपेक्षितच आहेत. अशातच या १४ गावांपैकी कोटा, शंकरलोधी, मुकदमगुडा व परमडोली या गावांमध्ये मागील काही दिवसांपासून हिवतापाची साथ सुरू आहे. अनेक रुग्ण हिवतापाने ग्रस्त असतानाही आरोग्य यंत्रणेला त्याचे काही सोयरसुतक दिसून आले नाही. याचा परिपाक म्हणून कोटा येथील मुद्रिकाबाई नारायण मोरे (२६) व दिगांबर नारायण गोपले (२५) यांचा मलेरियाने बळी गेला. शंकरलोधी येथील आशीद सुधाकर काटे या पाच वर्षाच्या बालकाचाही मलेरियानेच मृत्यू झाला. तर मुकदमगुडा येथील वर्ग दुसरीचा विद्यार्थी भिमजीत प्रकाश खंदारे याचाही याच आजाराने बळी घेतला. या आठ दिवसात परिसरातील चार जणांचा मलेरियाने मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे. मुद्रिकाबाई नारायण मोरे ही विवाहित महिला असून तिला तीन लहान मुले आहेत. यापैकी एका केवळ सहा महिन्याचा आहे. या महिलेचे दोन मुलेही मलेरिया आजाराने ग्रस्त होते. त्यांच्या उपचारासाठी ही महिला आदिलाबाद येथे गेली. मुलाची काळजी घेता घेता स्वत: दगावली. तर दिगांबर नागनाथ गोपले यालाही एक लहान मुलगी आहे. त्यांचा काल बुधवारी मृत्यू झाला. आजाराने बळी जात असल्याने भीतीचे वातावरण दिसून येत आहे. संपूर्ण गावामध्ये आणि परिसरातही तापाची साथ असून नागरिकही मोठ्या प्रमाणावर धास्तावलेले दिसत आहेत. (संबंधित वृत्त /४)गावातील प्रत्येक कुटुंब आजाराने ग्रस्तप्रस्तुत प्रतिनिधीने गावांना भेट दिली असता कोटा व शंकरलोधी या दोन्ही गावात प्रत्येक घरी सर्व व्यक्ती आजारी असल्याचे दिसते. कोणाला मलेरिया तर कोणाला विषमज्वराने (टायफाईड) ग्रासले आहे. लहानापासून तर वृध्दांपर्यंत सर्वच आजारी आहेत. मुकदमगुडा व परमडोली येथेही अनेकांना मलेरियाने ग्रासले आहे.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे दुर्लक्षकोटा हे गाव परमडोली तर शंकरलोधी हे गाव पुडियाल मोहदा ग्रामपंचायती अंतर्गत येते. पण येथील कर्मचारी गावाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. विहिरीत किंवा बोरींगमध्ये ब्लिचींग पावडर टाकले जात नाही. ग्रामसेवक गावात येऊन कधीच समस्या जाणून घेत नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.