शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या भुकटीने माखली ऊर्जानगर वस्ती

By admin | Updated: December 10, 2015 01:25 IST

ऊर्जानगर वस्तीच्या मध्यभागी असलेल्या चंद्रपूर वीज केंद्राच्या रोप वे मधून सतत कोळशाची काळी भुकटी उडत असते.

रोप वे बंद करण्याची मागणी : नागरिकांच्या आरोग्यावर परिणामअजिंक्य वाघमारे  दुर्गापूर ऊर्जानगर वस्तीच्या मध्यभागी असलेल्या चंद्रपूर वीज केंद्राच्या रोप वे मधून सतत कोळशाची काळी भुकटी उडत असते. त्यामुळे अख्खी वस्तीच काळ्या धुळीने माखली आहे. मानवास घातक या भुकटीचे येथील नागरिकांवर विपरीत परिणाम पडत असून त्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे. वेळीच हा रोप वे बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.चंद्रपूर वीज निर्मिती केंद्र रोप वे द्वारे दुर्गापूर कोळशा खाणीतून कोळशाची उचल करीत आहे. वीज केंद्राच्या स्थापनेपासून ही यंत्रणा सुरू आहे. याच्या एका बाजुस कोंढी, वेंढली तर दुसऱ्या बाजुस नेरी वस्ती आहे. या वस्तीच्या मध्यभागून रोप वे वीज केंद्रात गेला आहे. या यंत्रणेद्वारे रोज शेकडो टन कोळसा वीज केंद्रात वाहुन नेल्या जातो. एवढ्या प्रचंड कोळशाची रोज हाताळणी होत असताना त्यातून निघणारे कोळशाचे सुक्ष्म धुलीकण वातावरणात पसरत आहेत. पाणी फवारण्याच्या स्प्रींकलरप्रमाणे रोप वेतून भुकटीचा वर्षाव या वस्तीवर होतो. त्यामुळे येथील सारे रस्ते, घरांची छप्परे, आंगण आणि अख्खी वस्तीच काळ्या भुकटीने माखलेली आहे. येथील कुलूपबंद घरात तर काळ्या भुकटीचे थरावर थर साचलेले असतात. या भीषण जीवघेण्या प्रदूषणाने येथील नागरिक वैतागले आहेत. येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या शरीरात श्वसनातून, खान्यापिन्यातून २४ ही तास या भुकटीचा शिरकाव सुरू असतो. सलग ३३ वर्षापासून नागरीक याचा सामना करीत आहेत. आता याचे दुष्परिणाम नागरिकांना जाणवू लागले आहेत. येथील अधिकत्तर नागरिकांना श्वसनासंबंधी गंभीर आजार जडल्याने नागरिकांचे आरोग्य खालवत चालले आहे. नागरिकांच्या आरोग्याचा खेळखंडोबा करीत रोप वेवरून होणारी कोळशाची वाहतूक बंद करण्याची मागणी आहे.