शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नागभीडची महाशिवरात्री आणि शिवरथ

By admin | Updated: March 7, 2016 00:42 IST

येथील महाशिवरात्रीची यात्रा आणि नागभीड येथील कामुनवार परिवार, असे आता एक समिकरणच तयार झाले आहे.

घनश्याम नवघडे  नागभीडयेथील महाशिवरात्रीची यात्रा आणि नागभीड येथील कामुनवार परिवार, असे आता एक समिकरणच तयार झाले आहे. कामुनवार परिवाराने काढलेल्या रथयात्रेशिवाय नागभीड येथे महाशिवरात्रीनिमित्त भरणारी यात्रा पुर्णच होऊ शकत नाही.नागभीडच्या पश्चिमेला एक टेकडी असून या टेकडीवर शिवमंदीर आहे. या मंदिरात असलेले शिवलिंग स्वयंभू असून या शिवलींगाच्या दर्शनासाठी भाविक वर्षभर गर्दी करीत असतात. असे असले तरी महाशिवरात्री पर्वावर शिवटेकडीच्या पायथ्याशी यात्रेचे आयोजन परंपरेने होत आले आहे. शिवटेकडीच्या पायथ्याशी यात्रेचे आयोजन जसे परंपरेने होत आले आहे, तसेच कामुनवार परिवाराकडून शिवरथ मिरवणुकीचेही आयोजन गेल्या १५० वर्षापासून अविरत सुरू आहे. शिवरात्रीच्या दिवशी रथावर विराजमान असलेले शिवजींची विधीवत पुजा अर्चा झाल्यानंतर कामुनवार यांच्या घरून या मिरवणुकीला सुरूवात होते. ढोल, ताशे आणि विविध वाद्यांच्या निनादात ही मिरवणूक निघते. नंदीवर बसलेले शिवजी, बाजुला दोन पहारेकरी, एका रथावर विराजमान असतात. गावातील प्रमुख मार्गाने ही मिरवणूक फिरविण्यात येते. या मिरवणुकीत शहरातील सर्वच स्तरातील लोक सहभागी होत असतात.गावातील प्रमुख मार्गाने ही शिवरथ यात्रा फिरविण्यात आल्यानंतर शिवजींचा हा रथ शिवटेकडीच्या पायथ्याशी ठेवण्यात येतो. नंतर दोन गुरुवारी भरणाऱ्या यात्रेत भाविकांकडून शिवलींगासोबतच या शिवरथाचीही पुजा होत असते. दुसऱ्या गुरूवारची यात्रा झाल्यानंतर कामुनवार कुटुंब महाप्रसादाचे वितरण करून व पुजा अर्चा करून परत हा रथ घरी आणत असतात. पुर्वी हा रथ लाकडी होता. आता तो लोखंडी करण्यात तर आलाच पण त्यात बरीच सुधारणाही करण्यात आली आहे. १५० वर्षाची परंपरा असलेला महाशिवरात्रीचा हा उपक्रम आता कामूनवार परिवारातील राहूल आणि रंजन हे दोघे भाऊ चालवित आहेत.