शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

पेसा कायदा अंमलबजावणीत महाराष्ट्र पहिले राज्य

By admin | Updated: January 18, 2016 00:55 IST

राज्यातील २ हजार ८४३ ग्राम पंचायतमधील सहा हजार गावांचा समावेश पेसा कायद्यांतर्गत होत असून पेसामधील सर्व ग्रामपंचायतीला विकास निधी पुरविण्यात आला आहे.

विष्णू सावरा : चिमूर येथे प्रकल्प अधिकारी व मुलांच्या वसतिगृहाचे उद्घाटन चंद्रपूर : राज्यातील २ हजार ८४३ ग्राम पंचायतमधील सहा हजार गावांचा समावेश पेसा कायद्यांतर्गत होत असून पेसामधील सर्व ग्रामपंचायतीला विकास निधी पुरविण्यात आला आहे. त्यामुळेच पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी सांगितले. प्रकल्प कार्यालयामार्फत आदिवासी विकासाच्या योजना गरजूपर्यंत प्रभाविपणे पोहचवाव्यात तसेच या वसतिगृहात शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींमधून प्रशासकीय सेवेतील अधिकारी निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा ना. सावरा यांनी व्यक्त केली. चिमूर येथील प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व मुलांच्या शासकीय वसतिगृहाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार कीर्तिकुमार भांगडिया, प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी व नगराध्यक्षा शिल्पा राचलवार उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून ना. सावरा यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. १ कोटी २३ लाख रुपये खर्चून प्रकल्प कार्यालय तर २ कोटी ५० लाख रुपये खर्च करून आदिवासी मुलांचे वसतिगृहाचे बांधकाम करण्यात आले आहे. प्रकल्प कार्यालय व आदिवासी मुलांचे वसतिगृह भाड्याच्या इमारतीत होते. आदिवासी समाजातील कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, असे शासनाचे धोरण आहे. आदिवासी विभागाच्या वसतिगृहात राज्यात दरवर्षी ६० हजार विद्यार्थी प्रवेश घेतात. तर २५ हजार विद्यार्थी प्रतीक्षा यादीत असतात. या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. चिमूर प्रकल्पातील मागणी असलेल्या तिन्ही वसतिगृहाच्या बांधकामाला लवकरच मंजुरी देण्यात येईल, असे ते म्हणाले. चिमूर येथील वसतिगृहाची विद्यार्थी क्षमता ७५ असून वसतिगृहाच्या एक मजल्याच्या बांधकामासह विद्यार्थी क्षमता १५० करण्यास मंजुरी देण्याचे आश्वासन ना. सावरा यांनी दिले.आदिवासी समाजातील तरुण तरुणींचा कल स्पर्धा परीक्षेकडे वाढला पाहिजे. आज मंत्रालयात एकही आदिवासी सचिव नाही, आयएएस अधिकारी नाही, अशी खंत व्यक्त करुन भारतीय प्रशासकीय सेवेतील आदिवासी टक्का वाढवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चिमूर प्रकल्प क्षेत्रातील वसतिगृह बांधकामास मंजुरी व विद्यार्थी क्षमता वाढवून देण्याची मागणी आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी आपल्या भाषणातून केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)