शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : मी कोणत्या पक्षाचा नाही, तर जनतेचा उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:09 IST

२४ तासात चंद्रपूरकरांनी मी निवडणूक लढावी, यासाठी तिव्र आग्रह धरला. त्यांच्या प्रेमापोटी ही निवडणूक मी लढवीणार असून आता मी कोणत्याही पक्षाचा नाही तर जनतेचा उमेदवार आहे, असे सांगत आजपासून मी स्वत:ला चंद्रपूरकरांना समर्पित करीत आहे, असे भावनिक उदगार यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी जनतेपुढे काढले.

ठळक मुद्देकिशोर जोरगेवार : लोकभावना लक्षात घेऊन रिंगणात कायम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मी निवडणूक लढण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी चंद्रपूरकरांना २४ तासांचा अवधी मागितला होता. मात्र या २४ तासात चंद्रपूरकरांनी मी निवडणूक लढावी, यासाठी तिव्र आग्रह धरला. त्यांच्या प्रेमापोटी ही निवडणूक मी लढवीणार असून आता मी कोणत्याही पक्षाचा नाही तर जनतेचा उमेदवार आहे, असे सांगत आजपासून मी स्वत:ला चंद्रपूरकरांना समर्पित करीत आहे, असे भावनिक उदगार यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी जनतेपुढे काढले.सोमवारी चंद्रपूरमधील तुकूम येथील मातोश्री सभागृहात किशोर जोरगेवार यांचा जनतेशी जनसंवाद कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात जनतेला निवडणूक लढवणार की नाही, याविषयीचे त्यांचे मत सांगताना ते बोलत होते. जनतेच्या भावना लक्षात घेऊन किशोर जोरगेवार यांनी मी निवडणूक लढवणार, अशी घोषणा याप्रसंगी केली. या कार्यक्रमाला सेवादल अध्यक्ष सूर्यकांत खनके, बबनराव लंड, ख्रिश्चन समाज जिल्हा अध्यक्ष सुधाकर रामटेके, गंगाधर वैद्य, बबलू मेश्राम, जावेद खान, चंद्रमा यादव, वंदना हातगावकर, चंदाताई इटनकर, शाईन शेख यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.किशोर जोरगेवार यांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने प्रशासनाने रद्द केल्याने किशोर जोरगेवार यांनी आपण निवडणूक लढावी की नाही याबद्दलची माहिती स्पष्ट केलेली नव्हती. यामुळे किशोर जोरगेवार हे निवडणूक लढवणार की नाही यावर चंद्रपूरकरांमध्ये संभ्रम होता.याचे पडसाद रविवारी दिवसभरच चंद्रपूर शहरात उमटताना पाहायला मिळाले. हजारो नागरिकांनी रविवारी जोरगेवार यांनी लढावे, या मागणीसाठी जोरगेवार यांच्या घरी व कार्यालयात ठाण मांडले होते. या पार्श्वभूमीवर आज मातोश्री सभागृह येथे जनसंवाद कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमात नागरिकांची मत जाणून घेऊन किशोर जोरगेवार यांनी निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर