शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; विकास हेच ध्येय- कीर्तीकुमार भांगडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 06:00 IST

प्रचंड घोषणाबाजी आणि जल्लोषात चिमूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या रॅलीला लाभलेले हजारो लोकांचे समर्थन लक्षवेधी ठरले. विशेष म्हणजे, चिमूर मतदार संघातील बहुतांश गावातील नागरिक यावेळी आवर्जुन उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा शुक्रवार अखेरचा दिवस होता. या दिवशी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करून आपले नामांकन दाखल केले. यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, चिमूरचे विद्यमान आमदार कीर्तीकुमार भांगडिया, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, माजी आमदार सुभाष धोटे, माजी मंत्री संजय देवतळे यांच्यासह अन्य पक्ष व अपक्षांचा समावेश होता.चिमूर : प्रचंड घोषणाबाजी आणि जल्लोषात चिमूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या रॅलीला लाभलेले हजारो लोकांचे समर्थन लक्षवेधी ठरले. विशेष म्हणजे, चिमूर मतदार संघातील बहुतांश गावातील नागरिक यावेळी आवर्जुन उपस्थित होते.खासदार अशोक नेते, माजी आमदार मितेश भांगडिया, जि. प. उपाध्यक्ष कृष्णाजी सहारे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शाम हटवादे, तालुका अध्यक्ष दिलीप शिवरकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख धरमशिंह वर्मा, पं.स.गटनेता अजहर शेख, महिला आघाडी अध्यक्ष गीताताई लिंगायत, अपर्णा भांगडिया, माजी नगराध्यक्ष शिल्पा राचलवार व अनेक भाजप पदाधिकारी व गावागावातील नागरिक उपस्थित होते. बंटी भांगडिया यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी श्रीहरी बालाजी महाराज यांचे दर्शन घेतले. यावेळी तालुका भाजपच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.विकास हेच ध्येय- बंटी भांगडियाचिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी तालुक्यातील हजारो कार्यकर्ते या रॅलीत उपस्थित झाले होते. रॅलीत अपर्णाताई भांगडिया यांच्या नेतृत्वात भगवे वस्त्र परिधान करून मोठ्या संख्यने महिला व युवती समाविष्ट झाल्या होत्या. चिमूर येथील नेहरू विद्यालयाच्या पटांगणावर कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. त्यांनतर याच स्थळापासून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रोड शो करण्यात आला. कार्यकर्त्यांकडून बंटी भांगडिया यांच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी करण्यात येत होती. दरम्यान, जनतेचे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि विश्वास हीच माझी खरी शक्ती आहे. महिलांचे हक्क आणि त्यांचे अधिकार याबाबत मी नेहमी आवाज उठविल्याचे बंटी भांगडिया यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :chimur-acचिमूर