शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; येत्या पाच वर्षांत चंद्रपूर जिल्हा पाणीदार करणार - सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइंचे नेते रामदास आठवले, रासपचे नेते महादेव जानकर व सदाभाऊ खोत या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन राज्यातील सर्व २८८ जागांवर महायुतीचे उमेदवार उभे केले आहे. यावेळीही राज्यात महायुतीचे सरकार येईल, यात तीळमात्र शंका पडित व विचारवंतांच्या मनात नाही. महिला बचतगटाच्या आर्थिक सबलीकरणाच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत.

ठळक मुद्देसंडे अँकर । जिल्ह्यात सहाही विधानसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचा विश्वास

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या ५० वर्षात चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी जेवढा निधी उपलब्ध झाला नाही, तेवढा निधी आम्ही या पाच वर्षाच्या काळात उपलब्ध केला. सिंचनाच्या क्षेत्रातसुध्दा या जिल्ह्याने लक्षणीय प्रगती केली आहे. पुढील पाच वर्षात हा जिल्हा पाणीदार व्हावा यादृष्टीने आपण सर्वशक्तीनिशी प्रयत्न करणार आहोत, असा ग्वाही देतानाच या निवडणुकीत भाजप-शिवसेना-रिंपाइं-रासप महायुतीचे जिल्ह्यातील सहाही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवार येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइंचे नेते रामदास आठवले, रासपचे नेते महादेव जानकर व सदाभाऊ खोत या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन राज्यातील सर्व २८८ जागांवर महायुतीचे उमेदवार उभे केले आहे. यावेळीही राज्यात महायुतीचे सरकार येईल, यात तीळमात्र शंका पडित व विचारवंतांच्या मनात नाही. महिला बचतगटाच्या आर्थिक सबलीकरणाच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. हा जिल्हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर व्हावा यादृष्टीने आम्ही सर्वशक्तीनिशी प्रयत्न करू, असे सांगत या विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपा-शिवसेना युतीचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील, असा विश्वासही भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.चंद्रपूर येथे शनिवारी भाजपातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, नाना श्यामकुळे, अ‍ॅड. संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, रिपाईचे सिध्दार्थ पथाडे, जयप्रकाश कांबळे, सुरेश पचारे, डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर अंजली घोटेकर, स्थायी समिती सभापती राहुल पावडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ही निवडणूक विचारांची आहे, विकासाची आहे. राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तारूढ होईल, यात तिळमात्रही शंका नाही. गेल्या पाच वर्षात या जिल्ह्यात विकासाची लक्षणीय कामे झाली. धानोरा, तेलवासा, आमडी या बॅरेजेसला मंजुरी मिळाली आहे. चिचडोह सिंचन प्रकल्प पूर्ण झाला आहे.सरकारी योजना लोकांपर्यंत पोहचण्यासाठी ‘आवाज दो’ योजनापुढील पाच वर्षात या जिल्ह्यातील १५ ही तालुके पाणीदार व्हावे, यासाठी बंधारे, कॅनल्सचे बांधकाम करण्याचे नियोजन आहे. रमाई घरकूल योजना, शबरी योजना, पंतप्रधान आवास योजना या माध्यमातुन नागरिकांना घरकुलांचा लाभ देण्यात आला आहे. पुढील पाच वर्षात जिल्ह्यात एकही जण बेघर राहणार नाही, हा आमचा संकल्प आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात मोठे कॉटन क्लस्टंर उभारण्याचे आपले नियोजन आहे. पुढील पाच वर्षात आवाज दो ही योजना आपण सुरू करणार असून ज्या माध्यमातून सरकारी योजना लोकांपर्यंत पोहचतील. प्रत्येक तालुक्यात स्टेडियमचे बांधकाम करण्यात येईल. मिशन शक्ती अंतर्गत सहा स्टेडियम बांधकामाला मंजुरी मिळालेली आहे. चंद्रपूर शहरातील बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. महाकाली मंदीर परिसर विकासासाठी ६५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा जिल्हा राज्यातील सर्वाधिक विकसित जिल्हा ठरावा, यासाठी आम्ही प्रयत्नांची शर्थ करू, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर