शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प उभारणीतील विलंबामुळे महाजनकोला दीड हजार कोटींचा फटका

By admin | Updated: July 8, 2015 01:09 IST

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील आठ आणि नवव्या क्रमांकाच्या संचाच्या उभारणीचे काम बीजीआर कंपनीकडे देण्यात आले असले तरी,

बीजीआर कंपनीवर कृपादृष्टी : ८ व ९ युनिटचे करारनुसार काम अपूर्णचचंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील आठ आणि नवव्या क्रमांकाच्या संचाच्या उभारणीचे काम बीजीआर कंपनीकडे देण्यात आले असले तरी, या प्रकल्पातील यंत्रणेचे काम अद्यापही अपूर्णावस्थेतच आहे. परिणामत: व्यावसायिक तत्वावर वीज निर्मीती करण्यास विलंब होत असल्याने महाजनकोला जवळपास १ हजार ५०० कोटी रूपयांचा फटका बसला आहे.चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील आठ व नवव्या संचाचे काम २०१२ च्या मार्च व जून महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते. तसा करारही बीजीआर कंपनीसोबत झाला होता. मात्र कालावधी लोटूनही काम पूर्ण झाले नाही. परिणामत: प्रकल्पाची किंमत वाढत गेली. सध्याच्या अनुमानानुसार, दीड हजार कोटी रूपयांनी या प्रकल्पाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याचा भूर्दंड महाजनकोवरच बसणार आहे.आठ व नऊ क्रमांकाच्या संचाच्या उभारणीचे काम भेल आणि बीजीआर या कंपन्यांना देण्यात आले होते. त्यातील प्रकल्पाच्या बॉयलर टर्बाईन जनरेटरचे काम भेलला देण्यात आले होते. तर, हे काम वगळून अन्य सर्व कामे बीजीआर कंपनीला देण्यात आली होती.मागील तीन महिन्यांपूर्वी या प्रकल्पातील वीज निर्मीतीची चाचणी यशस्वीरित्या पार पडलीदेखील. मात्र या युनिटला इंधन पुरविणाऱ्या यंत्रणा, अ‍ॅश पाईपलाईन अद्यापही अपूर्णावस्थेतच आहे. यामुळे हा प्रकल्प अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. परिणामत: महाऔष्णिक विद्युत केंद्राचे करोडो रूपयांचे नुकसान दररोज होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)महाजनकोने बीजीआरसोबत केलेल्या करारनुसार, कामात विलंब झाल्यास कंत्राट काढून घेण्याची तरतूदही आहे. प्रसंगी संपूर्ण करारच रद्द करण्याचीही तरतुद आहे. मात्र बीजीआरवर कसलीही कारवाई होताना दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.अन्य ठिकाणीही विलंबराज्यातील परळी, खापरखेडा, चंद्रपूर, भूसावळ येथे नवीन प्रकल्प उभारणीचे काम सुरु आहे. मात्र या सर्वच ठिकाणी कामात प्रचंड विलंब होत असल्याने सरकारचे नुकसान होत आहे. वीज उत्पादनातही घसरण होत आहे. अधिकाऱ्यंकडून कंपन्यांची होणारी पाठराखणच यासाठी जबाबदार असल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला आहे.