शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

महादेवाला जातानाचे रडणे आता थांबले

By admin | Updated: March 6, 2016 00:43 IST

मध्य प्रदेशातील पचमढी या शहरापासून सुमारे १५-२० किमी अंतरावरील सातपुडा पहाडावरच्या मोठा महादेवाचे विदर्भातील ...

वसंत खेडेकर बल्लारपूरमध्य प्रदेशातील पचमढी या शहरापासून सुमारे १५-२० किमी अंतरावरील सातपुडा पहाडावरच्या मोठा महादेवाचे विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, वणी, बल्लारपूर, गोंडपिंपरी इत्यादी भागातील भगवान शंकराच्या भक्तांना मोठे आकर्षण ! दरवर्षी राखी पौर्णिमा, नामपंचमी आणि महाशिवरात्रीला येथून असंख्य भाविक गाड्या भरुन महादेव यात्रेला जात असतात. भाविकांचे मोठा महादेव हेआकर्षण गेल्या सात-आठ दशकापासून तर आजवर कायम आहे. त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. महादेव यात्रेला जाण्याकरिता पूर्वीहून आता कितीतरी सोयी झाल्या आहेत. रस्ते सुधारले, रहदारी साधनात वाढ झाली. पहाडी वाटेने, गंतव्य स्थळी जाण्याकरिता सोयीयुक्त पायऱ्या झाल्या. दोनही बाजूने कटघरे (रेलिंग) लावण्यात आल्या. ४०-५० वर्षांपूर्वी मात्र या प्रवासात तशा सुविधा नव्हत्या. भाविकांना रेल्वेने आणि त्यानंतर बराच प्रवास पायी करावा लागायचा. मध्य प्रदेशातील जुन्नारदेव हे रेल्वेचे या भागाकरिता जाण्यासाठी सोयीचे स्टेशन. त्यानंतर शंकराचे ठिकाण असलेल्या चौरागडला बरेच अंतर कापून पायी जावे लागायचे. रस्ता ओबडखाबड व कठीण असल्याने यात्रा पार करताना रस्त्यात मोठ्या अडचणी येत पहाडाच्या पायथ्याशी आल्यावर हिरवा या ठिकाणी आंघोळ व पूजा आटोपून पहाड चढणे सुरू व्हायचे. तीन मोठाले पहाड पार करीत मोठा महादेव स्थळ गाठावे लागते. पायथ्यापासून सुमारे तीन तासांचा १३०० पायऱ्या पार करण्याचा हा प्रवास म्हणजे कठीणच काम होते. त्याचे कारण, पूर्वी पायऱ्या सुरक्षित नव्हत्या आणि बाजूला सुरक्षित कठडे नव्हते. दोन्ही बाजूला मोठमोठ्या दरी आणि त्यातून हा मार्ग गाठणे एकंदरीत, महादेवाची यात्रा अवघड मानली जात होती. पायऱ्या पार करताना गर्दीच्या समयी धक्काबुक्कीत तोल जाऊन कुणी खाली पडला तर त्याचे जिवंत राहणे कठीणच! यामुळे महादेवाचे दर्शन घेण्याला गेलेला परत येईलच याची शाश्वती नाही, असे मानले जाई आणि म्हणून तशा काळी महादेव यात्रेला जाणाऱ्या भाविकांना सार (निरोप) देण्याकरिता त्यांचे नातेवाईक वा परिचित दुरवरुन येत आणि घरुन निघताना हुदके देत रडत असत. जाणारे आणि निरोप देणारे दोघेही असे रडत आणि तोंडी हर हर महादेव... चा गरज व महादेवाचे गाणे असा प्रकार चालायचा.पोहा (मिरवणूक) ने भक्तांना रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचविले जायचे. (अजूनही काही जण ‘पोहा’ने स्टेशनवर जातात.) पण आता काळ बदलला, साधने खूप झालीत. रेल्वेहून आणि कठीण मार्गाहून ट्रॅव्हल्स, सुमो या साधनांनी जाणे व झटपट यात्रा खूपच सोपी झाली आहे. महादेवाला गेलेला भक्त परत येणार की नाही, ही गोष्टच आता बाद झाली. आज सायंकाळला सुमोने घरुन निघा व परवा दुपारपर्यंत घरी सुखरुप व आरामाने परत या, यामुळे आता सार करताना कुणीच पूर्वीसारखे रडत नाहीत. उलट हसत हसत निरोप देतात आणि महादेवाची गाण म्हणतात... महादेवा येतो गा...माझ्या सांबाऽऽऽ