शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बफर क्षेत्रातील ७९ गावांतील १६ हजार ३२८ कुटुंबांना एलपीजी

By admin | Updated: August 24, 2016 00:31 IST

ग्रामीण भागात अदयापही जळावू लाकडाचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो.

७० गावे शंभर टक्के एलपीजीयुक्त : गावे होत आहेत चुलमुक्तचंद्रपूर : ग्रामीण भागात अदयापही जळावू लाकडाचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो. हा वापर कमी करुन जंगलाचा होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी वनालगतच्या गावांना एलपीजी गॅसचा पुरवठा करण्याची योजना वनविभागातर्फे राबविण्यात येत आहे. जिल्हयात बफर क्षेत्रातील ७९ गावांना एलपीजीचा पुरवठा करण्यात आला असून ७० गावे शंभर टक्के एलपीजी युक्त झाली आहे.जिल्हयात मोठया प्रमाणावर वनांचे क्षेत्र आहे. या क्षेत्रालगत अनेक गावे असून ही गावे जळावू लाकडांसाठी वनांवर आधारीत होती. लाकडासाठी झाडांची होणारी तोड थांबवून पर्यावरणासोबतच जिल्हयाचे अभयारण्य क्षेत्र सुरक्षित ठेवण्यासाठी एलपीजी गॅसचा पुरवठा केला जातो. जिल्हयातील अभयारण्य ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडण्यात आली आहे. या प्रकल्पाअंतर्गत बफर क्षेत्रामध्ये अनेक गावे आहेत. या गावातील कुटूंबांचे लाकडावरील अवलंबीत्व संपविण्यासाठी एलपीजी गॅस पुरवठयाची मोहिम हाती घेण्यात आली आहे.बफर क्षेत्रातील ७९ गावांना आतापर्यंत एलपीजी गॅसचा पुरवठा करण्यात आला. त्यामधील २१ हजार ८६० कुटूंबापैकी १६ हजार ३२८ कुटूंबांना एलपीजी देण्यात आली आहे. चालू वर्षी तीन हजार २९१ कुटूंबांना एलपीजी पुरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ७९ यापैकी तब्बल ७० गावातील शंभर टक्के कुटूंबांना गॅसचा पुरवठा करण्यात आल्याने ही गावे शंभर टक्के एलपीजी युक्त झाली आहे. या गावातील लाकडाचा वापर पूर्णपणे थांबला असल्याने ही गावे पर्यावरणास मोठया प्रमाणावर हात भार लावीत आहे. (स्थानिक प्रतीनिधी)ंंंंशेगडी ठेवण्यासाठी ओट्याचे बांधकामविशेष बाब म्हणजे एलपीजी गॅसवर स्वयंपाक करतांना महिलांना सोईचे जावे, यासाठी गॅस शेगडी ठेवण्यासाठी वनविभागाकडून लाभार्थ्यांना ओटेही बांधून देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ५९ कुटूंबांना गॅस ओटे बांधून देण्यात आले आहे. त्यामध्ये चालू वर्षी तीन हजार २९ ओटे बांधून दिले जात असून ओट्यांचे बांधकाम सुरु आहे. वनविभागाच्या या उपक्रमामुळे कुटूंबांना दिलासा देण्यासोबतच जळावू लाकडासाठी वृक्षांची मोठया प्रमाणावर होणारी वृक्ष तोड थांबून पर्यावरणास हात भार लागत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील वनांची होणारी वृक्षतोड थांबविण्यास वनविभागाची मोहीम यशस्वी होत आहे.