शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

लोकमान्य भद्रावतीचा मुलींचा क्रिकेट संघ राज्यस्तरावर

By admin | Updated: October 24, 2016 01:01 IST

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडूवर चंद्रपूर जिल्ह्याने नागपूर मनपा क्रिकेट संघावर मात करीत विभागीय क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकाविले.

अहमदनगर येथे होणार स्पर्धा : संस्थेतर्फे खेळाडूंचा सत्कारभद्रावती : अत्यंत अटीतटीच्या झालेल्या क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडूवर चंद्रपूर जिल्ह्याने नागपूर मनपा क्रिकेट संघावर मात करीत विभागीय क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. गोंदिया येथील जिल्हा क्रीडा कार्यालयाने १९ वर्षांखालील शालेय मुलींच्या विभागीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये भद्रावतीच्या लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने चंद्रपूर जिल्हा ग्रामीण संघाचे नेतृत्व केले. अहमदनगर येथे खेळल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ नागपूर विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहे, या संघाला प्रा.सचिन सरपटवार तसेच प्रा.स्वाती गुंडावार यांचे मार्गदर्शन लाभले.विजयी संघाचे लोकसेवा मंडळ भद्रावतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार शाळा समिती अध्यक्ष विकास उपगन्लावार प्राचार्य रेखा पबितवार, उपप्राचार्य गोपाल ठेंगणे, पर्यवेक्षक अविनाश पाम्पट्टीवार पर्यवेक्षक पांडुरंग बदकी, प्रा. विलास बोनगिरवार, क्रीडाप्रमुख देविदास जांभुळे, बंडू दरेकर, रूपचंद धारणे उपस्थित होते. अंतिम सामना चंद्रपूर जिल्हा व नागपूर मनपा सघ यांच्या झाला. चंद्रपूर जिल्ह्याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण पत्करले. नागपूर मनपाने संघाने ३९ धावा केल्या. चंद्रपूर जिल्ह्याने अगदी शेवटच्या चेंडूवर धाव घेत विजय प्राप्त केला. विजयी संघात जयश्री मडावी (कर्णधार), दीक्षा देवगडे, संजिवनी कावळे, अंजली गाडगे, नयन कोरडे, ज्ञानदीपा मडावी, सायली झाडे, तन्वी तुरारे, केतकी गंडाईत, स्विटी मुसळे, साक्षी मेंढे, रेणुका लांडे, राजश्री गुरनुले, भाग्यश्री खिराळे या खेळाडूंचा सहभाग होता. (तालुका प्रतिनिधी)