शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; दीड हजार सैनिक बजावणार लोकसभा मतदानाचा अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 22:21 IST

लोकसभा मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशा गावांत चर्चा रंगू लागल्या आहेत. प्रत्येक चौकाचौकांत जणू निवडणुकीचे विश्लेषणणच सुरू असल्याचे चित्र आहे. असे असले तरी उमेदवार मतदारांची जुळवाजुळव करण्यामध्ये गुंतले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघामध्ये एकूण मतदारांपैकी १ हजार ५५६ सैनिक मतदार असून ते आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहे.

ठळक मुद्दे१३ महिला सैनिकांचा समावेश : चंद्रपूर क्षेत्रात सर्वाधिक सैनिक मतदार

साईनाथ कुचनकार।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशा गावांत चर्चा रंगू लागल्या आहेत. प्रत्येक चौकाचौकांत जणू निवडणुकीचे विश्लेषणणच सुरू असल्याचे चित्र आहे. असे असले तरी उमेदवार मतदारांची जुळवाजुळव करण्यामध्ये गुंतले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघामध्ये एकूण मतदारांपैकी १ हजार ५५६ सैनिक मतदार असून ते आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहे.विधानसभानिहाय सैनिक मतदारांची संख्या लक्षात घेतली, तर चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात सर्वात जास्त म्हणजे, ३७७ तर आर्णी विधानसभा मतदार संघात सर्वात कमी १३० सैनिक आपला अधिकार बजावणार आहेत.लोकसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर आली असून उमेदवारांना केवळ १२ दिवसांचा कालावधी निवडणूक प्रचाराला मिळणार आहे. या कालावधीमध्ये त्यांना लोकसभा क्षेत्रातील तब्बल १ हजार ८०० गावांना भेटी द्याव्या लागणार आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात १८ लाख ९१ हजार ४४४ मतदार असून ९ लाख ८८ हजार ९०४ पुरुष मतदार, ९ लाख १२ हजार ५२६ महिला मतदारांची नोंद आहे. यामध्ये १४ तृतीयपंथी मतदार आहे. विशेष म्हणजे, लोकसभा क्षेत्रामध्ये १ हजार ५५६ सैनिक मतदार असून यातील १३ महिला सैनिक मतदार आहेत.विधानसभा मतदार संघानुसार सैनिक मतदारांमध्ये आर्णी विधानसभा क्षेत्रात- १३०, वणी- १३४, वरोरा-३४३, बल्लारपूर- २९३, राजुरा-१७९ सैनिक मतदार आहे. यामध्ये सर्वाधिक चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामध्ये ३७७ मतदार सैनिक आहे. महिला सैनिकांमध्येही चंद्रपूरची संख्या सर्वाधिक आहे. वरोरा, वणी, विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक एक महिला सैनिक मतदार आहे. आर्णीमध्ये दोन, राजुरामध्ये ४ तर चंद्रपूर मध्ये ५ महिला मतदार सैनिक मतदान करणार आहे. विशेष म्हणजे, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये एकही महिला सैनिक नाही.विशेष म्हणजे, यावर्षी पहिल्यांदाच २२ हजार ९६५ मतदार आपला हक्क बजावणार आहे. यामध्ये सर्वाधिक मतदार आर्णी विधानसभा क्षेत्रातील आहेत.१४ तृतीयपंथी करणार मतदानचंद्रपूर लोकसभा मतदार संघामध्ये एकूण मतदारांपैरकी केवळ १४ तृतीयपंथी मतदार आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात ११ जणांचे मतदार यादीत नाव असून आर्णी विधानसभा क्षेत्रात ३ जणांनी नोंदणी केली आहे. राजुरा, बल्लारपूर, वरोरा, वणी विधानसभा क्षेत्रामध्ये एकाही तृतीयपंथी मतदारांनी आपल्या नावाची नोंदणी केलेली नाही.