शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडा कार्यालयाला ठोकले कुलूप

By admin | Updated: May 12, 2016 01:11 IST

महानगरापासून काही अंतरावर असणाऱ्या नवीन चंद्रपूर येथील नागपूर गृह निर्माण व क्षेत्रविकास महामंडळाच्या

शिवसेनेचे आंदोलन : विविध समस्यांची सोडवणूक कराचंद्रपूर : महानगरापासून काही अंतरावर असणाऱ्या नवीन चंद्रपूर येथील नागपूर गृह निर्माण व क्षेत्रविकास महामंडळाच्या कार्यालयासमोर येथील शिवसेनेतर्फे बुधवारी सकाळच्या सुमारास घेराव आंदोलन करण्यात आले. म्हाडा निवासींच्या विविध समस्या सोडविण्यासाठी हे आंदोलन होत असताना कोणतेही वरिष्ठ अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी म्हाडा कार्यालयाला कुलूप ठोकले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख किशोर जोरगेवार यांनी केले. वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने अखेर एका कनिष्ठ अधिकाऱ्याला निवेदन देऊन समस्या मांडण्यात आल्या. म्हाडाचे मुख्याधिकारी उपस्थित होऊन समस्या सोडवित नाही, तोपर्यंत कार्यालय सुरू केले जाऊ दिले जाणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती.चंद्रपूरपासून काही अंतरावर म्हाडा वसाहत असून शासनाच्या या योजनेचा लाभ अनेकांनी घेतला. परंतु येथे अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. विशेष म्हणजे, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असलेले अधिकारी येथे कधीच उपस्थित राहत नाही आणि नागरिकांचे प्रश्न जैसे थे असतात. त्यामुळे त्रस्त झालेल्या जनतेने शिवसेनेच्या नेतृत्वात आंदोलनाची भूमिका घेतली. तब्बल चार ते पाच तास एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित न झाल्याने तिथे उपस्थित असलेल्या एका कनिष्ठ अधिकाऱ्याला घेराव घालून समस्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यात प्रामुख्याने कार्यालयात मंजूर असलेले उपअभियंता व इतर कर्मचारी उपलब्ध करून द्यावे, चंद्रपूरचे कार्यालय गाळेधारकांच्या कामांसाठी कार्यान्वित करावे, थकीत रकमेवर लागणारा व्याजदर इतर जिल्ह्याप्रमाणे कमी करावा. प्रत्येक खुल्या मैदानात एक हातपंप द्यावा. म्हाडा वसाहतीला लागून असलेला हॉड अ‍ॅड कोल्ड मिक्स प्लँटवर कारवाई करण्यात यावी. म्हाडा कॉलनीत मार्केटची व्यवस्था करण्यात यावी. व्यापारी संकुल उभारावे, रस्ते नाल्याची देखभाल करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारावी, कालनीतील पथदिवे, नाल्या व कचरा निवारण्याची व्यवस्था म्हाडाने करावी किंवा ग्रामपंचायत किंवा महानगर पालिकेला सुपुर्द करावी. खेळाचे मैदान विकसित करून बालोद्यान उभारावे, विविध कॉलनीतील ओपन स्पेसला संरक्षण भिंत उभारून द्यावी, जडवाहतुकीला प्रतिबंध करण्यात यावे व ज्या गाळेधारकांनी गाळ्याची संपूर्ण रक्कम दिली, त्यांना नोंदणी करून देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश होता.या आंदोलनात विकास वनकर, किशोर बोतुमवार, विनोद गरडवा, प्रवीण खनके, सुधीर मांजरे, विनोद गोल्लजवार, चंदन पाल, दिनेश व्याहाडकर, मुकेश गाडगे, नारायण खनके, बंटी लांजेवार, अमोल शेंडे, प्रकाश चंदनखेडे, राणी लोनगाडगे यांनी सहभाग घेतला. म्हाडा कार्यालयाला कुलूप ठोकल्याप्रकरणी कोणत्याही आंदोलनकर्त्यावर पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही. (शहर प्रतिनिधी)