शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

लॉकडाऊन ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:01 IST

जीवनावश्यक वस्तु वगळता कोणत्याही नवीन दुकानांना परवानगी देण्यात आली नाही. जिल्ह्यांमधील लॉकडाऊन जैसे-आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सोमवारी दिली. शहरांमध्ये कृष्ण नगर भागात एक पॉझिटिव्ह रूग्ण आढळला आहे.

ठळक मुद्दे१० पैकी ६ नमुने निगेटीव्ह : ‘त्या’ रूग्णाच्या संपर्कातील ४६ जणांची सूची तयार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील कृष्ण नगर भागातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाला. या रुग्णाची प्रकृती उत्तम असून त्याच्या संपर्कात आलेल्या ४६ जणांची सूची करण्यात आली आहे. संशयितांचे १० स्वॅब प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. पैकी ६ नमुने निगेटीव्ह आले. कंटेनमेंट झोनमध्ये १४ दिवस सर्वांच्या ये-जावर पूर्णत: बंदी आहे. जीवनावश्यक वस्तु वगळता कोणत्याही नवीन दुकानांना परवानगी देण्यात आली नाही. जिल्ह्यांमधील लॉकडाऊन जैसे-आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सोमवारी दिली.शहरांमध्ये कृष्ण नगर भागात एक पॉझिटिव्ह रूग्ण आढळला आहे. हा रूग्ण रात्रपाळी सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. त्या संपूर्ण इमारतीलाही सील करण्यात आले आहे. रूग्णाची दर तासाला तपासणी केली जात असून प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे या संदर्भातील कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी केले.कृष्णनगर वस्तीच्या आसपास असणाऱ्या इंदिरानगर, शास्त्रीनगर, बंगाली कॅम्प परिसराला प्रशासनाने सील केले. महानगर पालिकेने दिलेल्या परवानगी पासेसशिवाय कुणालाही या परिसरात जाता येणार नाही. आरोग्य तपासणी व नोंदी घेणे सुरू असून याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असेही जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांनी सांगितले. अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणात मजूर गावागावात परत जात आहेत. सर्वांना होम क्वारंन्टाइन करण्यात आले. जिल्ह्यात अडकून पडलेल्या अन्य राज्यातील मजुरांना पाठविण्याची मोहीम सुरू आहे. यासाठी स्वयंसेवी संस्था,अनेक संघटना प्रशासनाला मदत करीत आहे. मात्र ही मोहीम सुरू असताना नागरिकांनी बाहेरून येणाऱ्यांशी पुढील काही दिवस संपर्क टाळावे. कुणाची प्रकृती बिघडल्यास प्रशासनाला कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले.१४ उपनिबंधक कार्यालये सुरूचंद्रपुरातील सह दुय्यम निबंधक वर्ग २ चंद्रपूर व चंद्रपूर-२ या दोन कार्यालयांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील १४ तालुक्यातील दुय्यम निबंधक श्रेणी-१ कार्यालयातील स्थावर मालमत्तेच्या खरेदी-विक्री व्यवहाराला सोमवारपासून सुरूवात झाली. कोरोना पार्श्वभूमीवर केवळ चंद्रपुरातील दोन कार्यालय पुढील आदेशापर्यंत बंद राहतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.आदेशापूर्वीच उघडली दुकानेचिमूर : जिल्हा प्रशासनाकडून आदेश नसताना सोमवारी अनेक दुकाने सकाळी १० वाजतापासून सुरू उघडल्याचा प्रकार सोमवारी घडला. जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. शासनाने ग्रीन व ऑरेज झोनसाठी काही सवलती जाहीर केल्या. मात्र प्रशासनाने रविवारपर्यंत कोणताच आदेश काढला नव्हता. ४० दिवसांपासून लॉकडाऊन असलेले शेकडो नागरिक सोमवारी थेट रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या