शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांपुढे भारनियमनाचे नवे संकट

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वरोरा- भद्रावती उपविभागीय कार्यक्षेत्राअंतर्गत ग्रामीण भागात भारनियमन करण्यात येत आहे.

शेती सिंचन कसे होणार ?: लोकप्रतिनिधींचीही उदासीनतामाजरी : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वरोरा- भद्रावती उपविभागीय कार्यक्षेत्राअंतर्गत ग्रामीण भागात भारनियमन करण्यात येत आहे. यामुळे ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थितीत सुरु असणारे भारनियमन बंद करावे, अशी ग्रामीण भागातून केली जात आहे.पावसाळा असूनही वरूणराजाची कृपा होत नाही आणि सरकारी स्तरावर कृत्रिम पाऊसाची व्यवस्था केली जात नाही. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. अशातच आता वीज वितरण कंपनीने भारनियमन सुरू केल्याने आणखी परिस्थिती बिघडली आहे. पाऊस नसल्याने आणि विद्युत भारनियमन मोठ्या प्रमाणात असल्याने शेती सिंचन कसे होणार, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.एकीकडे सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला तर दुसरीकडे सरकारी भारनियमनाचे धोरण आडवे आले. यात बळीराजा भरडला जात असल्याची सर्वत्र ओरड ऐकविण्यात येते. या ग्रामीण परिसरात अनेक शेतकऱ्यांकडे सिंचन व्यवस्था असून केवळ वीज भारनियमनामुळे पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे.वातानुकूलित हवेत कार्यालयात बसून काम पाहणारे विद्युत अधिकारी यांच्याकडे ग्रामस्थांनी भारनियमन बंद करण्याची वेळावेळी मागणी केली. मात्र कोणताही उपयोग झाला नाही. लोकप्रतिनिधींनाही भारनियमन व शेती सिंचनाची अडचण सांगण्यात आली. त्यांच्याकडे बळीराजासाठी वेळ नाही. लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे अधिकाऱ्यांची मनमर्जी सुरु असल्याचा परिसरातील ग्रामस्थांचा आरोप आहे.निवडणुकीच्या काळात मोठमोठ्या आश्वासनाची खैरात करणारे पुढारी- नेते व लोकप्रतिनिधी यांचासुद्धा ग्रामीण क्षेत्रातील भारनियमनाकडे कानडोळा होत असल्याची सर्वत्र ओरड सुरू आहे. मागील वर्षी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत राजकीय पुढारी, उमेदवार व सर्वच प्रचार करणारे, शेती आणि शेतकरी यांच्या हिताची भाषा बोलत होते. मात्र आता शेतकरीवर्ग संकटात सापडला असताना भारनियमन बंद होण्यासाठी कुणीच पावलं उचलायला तयार नाहीत. भद्रावती तालुक्यात एकही सिंचन प्रकल्प नाही. याचेही कुणालाच सोयरसुतक दिसून येत नाही. निवडणुकीदरम्यान व पुढे सत्ता परिवर्तन झाल्यानंतर ग्रामीण भागासाठी अच्छे दिन येणार, असे सर्वत्र बोलले जात होते. मात्र तसे काहीच झाले नसून पूर्वीसारखेच आणि त्यापेक्षा वाईट दिवस शेतकऱ्यांचे आले आहे. तरीही शासन काहीही करताना दिसत नाही, हे आणखी एक शेतकऱ्यांचे दुर्दैव. (वार्ताहर)