शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मूल तालुक्यात दारूविक्री जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:34 IST

जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मूल तालुक्यातील चिचाळा-भेजगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूविक्री होत आहे. मात्र पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष पसरला आहे.

ठळक मुद्देपोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष : वरिष्ठांनी दखल घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मूल तालुक्यातील चिचाळा-भेजगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूविक्री होत आहे. मात्र पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष पसरला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ ला दारूबंदी करण्यात आली. यामुळे जिल्ह्यात दारूचे सेवन करणे, दारू बाळगणे, दारूची वाहतूक करणे, दारूविक्री करणे गुन्हा आहे. परंतु मूल तालुक्यात सर्रास दारूची वाहतूक व विक्री होत आहे.काही दिवसांपुर्वी मूल येथील पटवा नामक दारूविक्रेत्याच्या घरून २६ लाखांची देशी-विदेशी दारू पकडण्यात चंद्रपूर येथील गुन्हे शाखेला यश आले. मात्र मूल पोलिसांना त्याबाबत माहिती नव्हती. यावरून मूल पोलीस अवैध दारूविक्रीबाबत किती गंभीर आहेत, हे दिसून येते.मूल तालुक्यातील चिचाळा-भेजगाव परिसरात मोठया प्रमाणावर अवैध दारूविक्री होत असल्याची नागरिकांची ओरड आहे. याकडे स्थानिक पोलीस प्रशासनाने लक्ष दिल्यास दारूविक्री करणाऱ्यांचे जबंग फुटू शकतो. मात्र याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे.एखाद्या दारू तस्कराची माहिती मिळाल्यास केवळ देखावा करण्यासाठी पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र त्या कारवाईत अल्पसा दारूसाठा दाखविले जात असल्याचेही नागरिक सांगतात. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.अंमलबजावणी करणारेच करतात दुर्लक्षदारूमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होत असल्याने वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारूबंदी अभियानाअंतर्गत जिल्ह्यात दारूबंदी आंदोलन करण्यात आले. श्रमिक एल्गारच्या नेतृत्वात अनेक आंदोलन, मोर्चे काढण्यात आले. यामुळेच शासनाने जिल्हात दारूबंदी केली. दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे.