शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

नरेश पुगलियांचे पोलीस अधीक्षकांना पत्र

By admin | Updated: September 6, 2015 00:53 IST

रोहीत बोथरा मारहाण प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, ...

चंद्रपूर : रोहीत बोथरा मारहाण प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांनी एका पत्राद्वारे चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्याकडे केली आहे.सराईत गुंडांना थर्ड डिग्री देण्याचा पोलीस खात्याचा प्रघात आहे. मात्र निरपराध सामान्य नागरिकाला बेदम मारहाण करून उलट त्याच्यावरच गुन्हे दाखल करणे, हे कशाचे द्योतक आहे, असा सवाल नरेश पुगलिया यांनी पत्रातून उपस्थित केला आहे. जनता व पोलीस यांच्या सामंजस्याचे व सलोख्याचे संबंध असताना पोलिसांच्या अशा उर्मट वर्तनाचा चंद्रपूर शहरातील सामान्य जनता व व्यापाऱ्यांनी निषेध नोंदविला आहे. आपल्या शब्दावर विश्वास ठेऊन व्यापाऱ्यांनी आपला बंद मागे घेतला. त्यामुळे उर्मट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आपणाकडून कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र आपण मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची केवळ बदली केली. आणि चौकशीचे आदेश दिले. परंतु प्रकरणाचे गांभिर्य ओळखून त्यांना निलंबित करून त्यांची चौकशी करता आली नसती का, असा सवालही त्यांनी पत्रातून उपस्थित केला.चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीनंतर या निर्णयाला गालबोट लावण्याचे कार्य काही पोलीस अधिकारी व कर्मचारी करीत असल्याचा आरोप पुगलिया यांनी पत्रातून केला आहे.पूर्वी जिल्ह्यात ४०० ते ५०० देशी-विदेशी दारूची दुकाने होती. परंतु बंदीनंतर जवळपास पाच हजार लोक अवैध दारू विक्रीच्या व्यवसायात गुंतले असल्याचा दावाही पुगलिया यांनी पत्रातून केला आहे. या अवैध दारू विक्रीचा लहान मुलांच्या मनावर विपरित परिणाम होत असून आर्थिक व्यवहारही वाढले असल्याचे पुगलिया यांनी म्हटले आहे. रोहीत बोथरा मारहाण प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिक व पोलिसांमध्ये मोठी दरी निर्माण करणारी ही घटना असल्याने या प्रकरणात आपण न्याय द्यावा, अन्यथा न्यायासाठी मानवाधिकार अथवा उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही पुगलिया यांनी पत्रातून दिला आहे. (प्रतिनिधी)