शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

ऑफलाईन नामांकनासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:38 IST

चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज सादर करण्‍याची परवानगी देण्‍याची मागणी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍य ...

चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज सादर करण्‍याची परवानगी देण्‍याची मागणी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्‍य निवडणुकअधिकारी मदान यांच्‍याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

३० डिसेंबर २०२० ही ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आवेदन करण्‍याची शेवटीची तारीख आहे. चंद्रपूर जिल्‍ह्यातील काही तालुक्‍यांमध्‍ये बीएसएनएलच्‍या नेटवर्कमधील अनियमिततेमुळे उमेदवारांना त्रास सहन करावा लागत आहे. अतिशय मंदगतीने इंटरनेट चालु असल्‍याने उमेदवार त्रस्‍त झाले आहेत. लोकशाहीमध्‍ये ज्‍या निवडणुकीला गावपातळीवरील विधानसभा म्‍हटले जाते, अशा ग्रामपंचायत निवडणुकीमध्‍ये उमेदवारांना अर्ज भरण्‍याच्‍या प्रक्रियेतच गैरसोयीचा सामाना करावा लागत आहे. राज्‍यातील इतरही जिल्‍ह्यांमध्‍ये ही समस्‍या उमेदवारांना सहन करावी लागतच आहे.

उमेदवाराला प्रचाराऐवजी अर्ज भरण्‍याच्‍या प्रक्रियेतच वेळ द्यावा लागत आहे. इंटरनेटच्‍या समस्‍येमुळे फॉर्म अपलोड होत नसल्‍याने प्रक्रिया क्लिष्‍ट झाली आहे. अर्ज भरण्‍याची प्रक्रिया सहज, सुलभ, सरळ असणे अपेक्षित आहे. मात्र इंटरनेटच्‍या समस्‍येमुळे ही प्रक्रिया सहज, सुलभ, सरळ उरलेली नाही. त्‍यामुळे उमेदवार चिंतीत झाले आहे. अर्ज भरण्‍याची प्रक्रिया ऑनलाईन न करता ऑफलाईन अर्ज सादर करण्‍याची अनुमती उमेदवारांना देण्‍याची आवश्‍यकता असल्‍याचे आ. मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.