शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

देवाडा खुर्द येथील पट्टेधारक मोकाटच

By admin | Updated: April 26, 2016 00:42 IST

तालुक्यातील अनेक गावे बोगस प्रकरणांनी बरबटले असून देवाडा खुर्द येथील बोगस पट्टेधारकांच्या विरोधात ...

कार्यवाही नाही : सातबारा रेकॉर्डवरुन नाव कमी न केल्यास गावकरी करणार आंदोलनपोंभुर्णा : तालुक्यातील अनेक गावे बोगस प्रकरणांनी बरबटले असून देवाडा खुर्द येथील बोगस पट्टेधारकांच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आवाज उठविल्याने सदर प्रकरणाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी काही बोगस पट्टे रद्द केले. परंतु एक महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा त्यांचे सातबारा रेकॉर्डवरुन अजुनपर्यंत नाव कमी करण्यात आले नाही. तसेच बोगस पट्टेधारकांवर कुठलीच कारवाई केली नसल्याचे संबंधित बोगस पट्टेधारक मोकाटच फिरत आहेत. त्यामुळे संबंधींतावर कारवाई न झाल्यास आणि त्यांचे नावे सातबारा रेकार्डवरुन कमी न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील बोगस पट्टेधारकांनी मूळ रेकॉर्डवर कुठलेही नाव दर्ज नसताना आणि वडिलोपार्जित अतिक्रमण नसतानासुद्धा केवळ अधिकाऱ्यांना वृत्ताशी धरुन त्यांचेसोबर आर्थिक व्यवहार करून स्थानिक ग्रामस्थांच्या गुरे-ढोरे ठेवण्याच्या व चराईच्या जागेवर बोगस पट्टे तयार करून त्यामध्ये ट्रॅक्टरद्वारे धान शेतीचे बांध काढण्यात आले. त्यातील असलेल्या बांबू व इतर झुडपांचे ट्रॅक्टरद्वारे नुकसान करण्यात आले. मात्र या विषयावर महसूल व वनविभागही मूग गिळून गप्प राहिले. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी आवाज उठविला आणि जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे गावातील ८०० पेक्षा अधिक ग्रामस्थांचे स्वाक्षरीनिशी लेखी निवेदन सादर केले. त्याअनषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीत गंभीर प्रकरणाची दखल घेवून १७ मार्चला काही बोगस पट्टेधारकांचे पट्टे रद्द केले. परंतु सदर बाबीला एक महिण्याचा कालावधी लोटृन सुद्धा त्यांची नावे सातबारा रेकॉर्डवरुन कमी करण्यात आले नसल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. बोगस पट्टेधारकांची मूळ रेकॉर्डवर कुठलीही नोंद नसताना आणि सदर जागा १९६० मध्ये शासनानी ग्रामपंचायतीला हस्तांतरित केली असताना कोणत्या सबबीवर त्यांना पट्टे देण्यात आले, असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला असून शासनाची दिशाभूल करून राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या या व्यक्तींना बोगस पट्टे मिळवून देण्यात पोंभूर्णा येथील भाजपाच्या एका जेष्ठ कार्यकर्त्याचा वरदहस्त असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे. त्यामुळे संबंधीत प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणातमदोषी असलेल्या अधिकारी व राजकीय क्षेत्रातील वरदहस्तकांवर कारवाई करण्यात यावी तसेच संबंधीत बोगस पट्टेधारकाचे नाव रेकॉर्डवरुन काढण्यासाठी तीव्र आंदोलन करू असा इशारा देवाडा खुर्दच्या ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)