शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

आज आणि उद्या मतदार बनण्याची शेवटची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 23:08 IST

लोकसभा निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजू शकतो. तत्पूर्वी आपला मताधिकार बजावण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मतदार नोंदणीची शेवटची संधी २ व ३ मार्च रोजी उपलब्ध आहे. लोकशाहीमध्ये जबाबदार नागरिक म्हणून आपल्या मताधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी मतदार यादीमध्ये आपले नाव आहे अथवा नाही, याची खात्री करून घ्यावी. नसेल तर लगेच ६ क्रमांकाचा अर्ज करून मतदार व्हावे, ही शेवटची संधी असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : ंसर्व महाविद्यालयात अर्ज उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजू शकतो. तत्पूर्वी आपला मताधिकार बजावण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मतदार नोंदणीची शेवटची संधी २ व ३ मार्च रोजी उपलब्ध आहे. लोकशाहीमध्ये जबाबदार नागरिक म्हणून आपल्या मताधिकाराची अंमलबजावणी करण्यासाठी मतदार यादीमध्ये आपले नाव आहे अथवा नाही, याची खात्री करून घ्यावी. नसेल तर लगेच ६ क्रमांकाचा अर्ज करून मतदार व्हावे, ही शेवटची संधी असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात जारी केलेल्या सूचनेनुसार संपूर्ण देशभर मतदार नोंदणी शेवटच्या टप्प्यात असून याचा फायदा उद्या व परवा नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषत: नवमतदारांनी ज्यांचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक आहे. त्या सर्वांनी या मोहिमेचा फायदा घ्यावा. फक्त आधार कार्ड व आपले रहिवासी ओळखपत्र व एक पासपोर्ट साईज फोटो घेऊन फॉर्म नंबर ६ भरणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आॅनलाईन पद्धतीनेदेखील मतदारांना आपल्या नावाची नोंदणी करता येते. तसेच २ मार्चला जिल्ह्यामध्ये सर्व मतदान केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शहरातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना याबाबत सूचना करण्यात आली असून उद्या व परवा कॉलेजमध्येदेखील मतदान नोंदणीची सुविधा उपलब्ध राहणार आहे.मतदार यादीमधील नाव तपासणे, चंद्रपूरमध्ये दीर्घ कालावधीपासून रहिवासी असणाऱ्यांनी या जिल्ह्यांमध्ये आपल्या नावाची नोंदणी करणे व अन्य त्यांच्या कोणत्याही अडचणी संदर्भात नागरिकांनी जवळच्या मतदान केंद्रावर भेट देऊन आपली अडचण दूर करावी, असे आवाहन करण्यात आले. यावेळी पत्रकार परिषदेला उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटे उपस्थित होते.यावेळी इव्हीएम मशीन व व्हीव्ही पॅट यंत्रणेच्या मार्फत मतदान किती सुलभ, सहज व पारदर्शी झाले आहे, याचे पत्रकारांसमक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.