शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 22:35 IST

उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय बल्लारपूर येथे भोंगळ कारभार सुरू आहे. वारसान नोंद फेरफारसाठी सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरीही नोंद घेण्यास अधिकारी असमर्थता दर्शवित असल्याने या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यांपासून फेरफार नोंदी नाही : अधिकारी सुस्त जनता त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय बल्लारपूर येथे भोंगळ कारभार सुरू आहे. वारसान नोंद फेरफारसाठी सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरीही नोंद घेण्यास अधिकारी असमर्थता दर्शवित असल्याने या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.कोठारी येथील आशाबाई पेटकुले यांनी सहा महिन्यांपूर्वी आई - वडील मरण पावल्यानंतर वारसान नोंद फेरफारसाठी अर्ज केला होता. यासाठी त्या सतत सहा महिन्यांपासून भूमी अभिलेख कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. मात्र त्यांच्या प्रकरणात कुठल्याही त्रुटी नसतानाही वारसान नोंद घेण्यात आली नाही. या कार्यालयात बल्लारपूर शहर व ग्रामीण भागातील जनता मोजणी, वारसान फेरफार, विक्री नोंदी घेण्यासाठी अर्ज करीत असतात. मात्र नागरिकांच्या अर्जावर योग्य तो निर्णय घेवून निकाली काढणे आवश्यक असताना त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. या कार्यालयात शेकडो प्रकरणे प्रलंबित असून कामचुकार कर्मचाऱ्यामुळे जनता त्रस्त झाली आहे.या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कुणाचाही वचक नसून सध्या कार्यरत असलेल्या उपअधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचे काम होत आहे. आपल्या अर्जाचे काम झाले का, याकरिता विचारणा करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना योग्य माहिती दिली जात नाही व उद्धटपणे बोलून हाकलून लावले जाते.काही कर्मचारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना चिरीमिरीची मागणी करून सतावत असतात. विविध कामासाठी व फेरफार, मोजणीचे अर्ज लवकरच निकाली काढून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची नोंद घेवून सैरावैरा सुटलेल्या कर्मचाऱ्यांवर प्रतिबंध घालण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.कार्यालयातील काही कर्मचारी आपण सूचविलेल्या कामाकडे दुर्लक्ष असतात. आपणाकडे बल्लारपूर व पोंभुर्णा या तालुक्याचा प्रभार असल्याने दोन्हीकडे लक्ष द्यावे लागते. मात्र फेरफारचे काम ज्यांच्याकडे सोपविले होते, ते निष्क्रीय असल्याने त्यांचे वेतन थांबवून त्याचा प्रभार दुसऱ्यास दिला आहे. जनतेचे अर्ज लवकरच निकाली काढून व विस्कटलेला कारभार नियमित करणार.-एस. टी. वाकटी, उपअधीक्षकभूमी अभिलेख बल्लारपूर.