शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

अल्पावधीतच वाहून गेला लाखो रूपयांचा बंधारा

By admin | Updated: September 14, 2016 00:49 IST

मूल तालुक्यातील ताडाळा येथे जलशिवार योजनेअंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून चालु ...

ग्रामस्थांनी केली तक्रार : अधिकारी व कंत्राटदारावर कारवाईची मागणीभेजगाव : मूल तालुक्यातील ताडाळा येथे जलशिवार योजनेअंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून चालु आर्थिक सत्रात जवळपास सात लाख रूपये खर्च करून बंधारा बांधण्यात आला. मात्र हा बंधारा अल्पावधीतच वाहून गेल्याने ग्रामपंचायती विरोधात शेतकऱ्यांत रोष पसरला आहे. त्यामुळे ग्रामसेवक व कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी नेहमीच त्रस्त असून दरवर्षी दुष्काळामुळे होरपळून निघणाऱ्या शेतकऱ्यांना बंधाऱ्याच्या माध्यमातून पाण्याची साठवणूक व्हावी, त्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी, पाणी अडून तिथेच जिरावे या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. मात्र भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदारामुळे या योजनेला ग्रहण लागल्याचे चित्र आहे.शेतकऱ्यांनी वारंवार केलेली मागणी लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने सात लाख रुपये खर्च करून पाच महिन्यापूर्वी बापूजी बामणे यांच्या शेताजवळील नाल्यावर बंधारा बांधला. यामुळे परिसरातील शेतकरी सुखावले. मात्र संबंधित कंत्राटदाराकडून बंधाऱ्याचे काम नित्कृष्ठ झाल्याने पहिल्याच पावसाळ्यात बंधारा वाहून गेला. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये व्यर्थ गेले असून शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.सदर बंधाऱ्याचे काम ग्रामसेवक, कंत्राटदार, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे अंदाजपत्रकानुसार सिमेंट क्राँक्रीट वापरले नाही. माती मिश्रीत नित्कृष्ठ दर्जाचे साहित्य वापरुन बांधकाम केल्याने बंधारा अल्पावधीतच वाहून गेला. त्यामुळे या बंधाऱ्यात पाणी न साचता पाणी उमा नदीला वाहून गेले. परिणामत: दुष्काळस्थितीत शेतकऱ्यांना पुन्हा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.या बंधारा कामाची चौकशी करून ग्रामसेवक, कंत्राटदारावर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी सीईओ यांना दिलेल्या निवेदनातून बाबुराव जरातेसह शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)