शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तरुणीची ओळख पटली ?

By admin | Updated: May 5, 2016 01:23 IST

जळालेल्या तणसाच्या ढगात अर्धवट जळालेल्या तरुणीची ओळख पटली असून ती जवळच्या किरमिटा येथील असल्याची माहिती आहे.

पोलीस संभ्रमातच : नातेवाईकांनी केली पुष्टीनागभीड : जळालेल्या तणसाच्या ढगात अर्धवट जळालेल्या तरुणीची ओळख पटली असून ती जवळच्या किरमिटा येथील असल्याची माहिती आहे. तिच्या नातेवाईकांनी बुधवारी येथील ग्रामीण रुग्णालयातून तिच्या शिल्लक राहिलेल्या कापडाच्या तुकड्यावरुन ही ओळख पटवल्याचीही माहिती आहे. पण पोलिसांनी या बाबीस दुजोरा दिलेला नाही.मंगळवारी पांजरेपार येथील एकनाथ भाऊजी उरकुडे हे आपल्या शेतात बैलबंडीने तणस आणण्यासाठी गेले असता त्यांचा तणसाचा ढग जळालेला आढळून आला व त्या ढगात एका तरुणीचे प्रेतही जळालेल्या अवस्थेत दिसून आले. लागलीच त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी जाऊन मोका पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी प्रेत नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले.दरम्यान, किरमिटी येथील एक तरुणी रविवार पासून गावात नसल्याची बाब पोलिसांना समजली. पोलिसांनी चौकशीचा एक भाग म्हणून अधिक चौकशी केली असता किरमिटी येथील तरुणी गावात नसल्याची बाब समोर आली. पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना विचारणा केली असता रविवारी ११.३० वाजतादरम्यान तिला एक भ्रमणध्वनी आला व ती १२ वाजता घरुन गेल्याची माहिती पोलिसांना दिल्याचे समजते. दरम्यान, हे नातेवाईक येथील ग्रामीण रुग्णालयात आले व तिच्या अंगावर उरलेल्या कापडाच्या तुकड्यावरुन तीच असल्याचे सांगितले, अशी माहिती आहे. बुधवारी हे नातेवाईक गावच्या प्रमुख व्यक्तींसह पोलीस ठाण्यात हजर होते.येथील ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रेताची अवस्था लक्षात घेता उत्तरीय तपाणी करण्यास असमर्थता दर्शविल्याने सदर तरुणीचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी चंद्रपूरला पाठविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)मुलगी तीच आहे असे आज तरी म्हणता येणार नाही. आमचा तपास सुरु आहे. अन्य बाबीवरुनही ओळख पटविण्याचे आमचे प्रयत्न सुरु आहेत. - मनोज मेश्राम, पोलीस अधिकारी पो.स्टे. नागभीड