शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कष्टकरी शेतकऱ्यांची झोळी अजूनही रिकामीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2017 00:48 IST

शेतमालाच्या दरवाढीवरच शेतकऱ्यांचा वर्षभराचा पसारा अवलंबून आहे. सध्या कापूस वगळता सर्वच शेतमालाचे भाव पडले आहेत.

शेतमालाच्या दरवाढीची आशा मावळली : कापूस वगळता शेतमालाचे भाव पडलेगोवरी : शेतमालाच्या दरवाढीवरच शेतकऱ्यांचा वर्षभराचा पसारा अवलंबून आहे. सध्या कापूस वगळता सर्वच शेतमालाचे भाव पडले आहेत. मायबाप सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. आज ना उद्या शेतमालाचे भाव वाढेल, या आशेवर शेतकरी होते. मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतमालाच्या दरवाढीअभावी परवड झाल्याने शेतकऱ्यांची झोळी अजूनही रितीच आहे.शेतकरी दिवसंरात्र शेतात राबतो. परंतु शेतकऱ्यांच्या पाठिशी आज कुणीही उरला नाही. त्यामुळे शेतकरी कायमचा निराधार झाला आहे. शेतातील पिकलेला माल घरी आल्यावर शेतमालाचे भाव पाडले जाते. ही या देशातील शेतकऱ्यांची सर्वात मोठी शोकांतिका आहे. यावर्षी उसनवारी व कर्ज काढून शेतकऱ्यांनी कशीबशी शेती पिकविली. परंतु शेतकऱ्यांनी केलेल्या उत्पादन खर्चापेक्षा शेतमालाला मिळणारा दर तोकडा आहे. हा कालआजचा अनुभव नाही तर गेल्या ५० वर्षांपासून शेतकऱ्यांच्या बाबतीत हेच घडत आहे. यावर्षी कापसाला बऱ्यापैकी भाव आहे. मात्र कापूस वगळता सोयाबीन, तूर, ज्वारी, गहु, हरभरा, या नगदी पिकांचे भाव पडले आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा यापेक्षा वेगळी नाही. धानाला दोन हजार रुपयाच्यावर भाव चढत नाही. मग शेतकऱ्यांनी केवळ शेतातच राबायचे काय? या प्रश्नाचे उत्तर अजूनही आमच्या मायबाप सरकारला शोधता आलेले नाही.शेतमालाला तोकडा दर असल्याने शेतकऱ्यांवर असलेला कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. उत्पादन खर्च वाढला, त्या तुलनेत शेतमालाचे भाव वाढणे अपेक्षित आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या बाबतीत आजपर्यंत उलटच घडत आहे. पुर्वीसारखा आज शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर कोणताही राजकीय नेता पेटून उठताना दिसत नाही. एखाद्या शेतकरी नेत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविला तर सरकार त्याचा आवाज दाबून टाकतात. ना पुढारी, ना सरकार पाठिशी, मग शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्काचा न्याय मागायचा कुणाकडे? हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून अजूनही अनुत्तरीतच आहे. दिवसरात्र शेतात काबाडकष्ट करुनही शेतकऱ्यांना ‘घामाचे दाम मिळत नाही’ त्यामुळे शेतात राबूनही शेतकऱ्यांची झोळी अजूनही रितीच आहे. (वार्ताहर)शेतकऱ्यांचे ‘अच्छे दिन’ गेले कुठे?शेतकऱ्यांचे अच्छे दिन येईल, असे स्वप्न निवडणुकीपूर्वी भाजपा सरकारने दाखविले होते. शेतकऱ्यांनाही आपले सुखाचे दिवस येईल, अशी आस होती. मात्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेच निर्णय घेतले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अच्छे दिनच्या स्वप्नांचा पार चुराडा झाला आहे.