शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

कुणबी समाजालाही १२ टक्के आरक्षण द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:33 IST

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू केले आहे. मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल, यासाठी मागासवर्ग आयोगाद्वारे समिती नेमून त्या समितीने शिफारस केल्याप्रमाणे मराठा समाज हा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे, हे मान्य केले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण लागू केले आहे. मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल, यासाठी मागासवर्ग आयोगाद्वारे समिती नेमून त्या समितीने शिफारस केल्याप्रमाणे मराठा समाज हा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे, हे मान्य केले. त्यामुळे कुणबी समाजही आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीयदृष्ट्या मागासलेला असल्याने या समाजाला १२ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी धनोजे कुणबी समाजाने केली आहे. यासंदर्भात लवकरच आंदोलनाचा मार्ग अवलंबिण्यात येईल, असा इशारा चंद्रपूर कुणबी समाजाचे अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते यांनी दिला आहे.महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण घोषित केले. न्यायालयीन लढाईत उच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण पूर्णपणे वैद्य ठरवत ते १२ ते १३ टक्के करण्यात यावे, अशी सूचना राज्य सरकारला केली. राज्य सरकारने आपल्या अधिकारात या सत्रापासून शैक्षणिक आणि नोकरीच्या संदर्भात आरक्षण तत्काळ लागू करावे, असा आदेश दिला आहे.लवकरच आंदोलन आपसातील मतभेद, पोट जातीतील भेद विसरून आरक्षणासाठी एकत्र येऊन भक्कम लढा उभा करण्याची गरज आहे. चंद्रपुरात या प्रश्नावरून लवकरच आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात येणार असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.आर्थिक मागासलेपण महाराष्ट्रात बहुसंख्येने असणारा व पूर्वजात कोरडवाहू शेतीवर अवलंबून असणारा कुणबीसमाज आज दारिद्रयरेषेखाली जीवन जगत आहे. कुणबी समाजातील बहुसंख्य जनता ही उच्च शिक्षणापासून वंचित आहे. खेड्यात अल्पभुधारक शेतमजूर आणि शहरात झोपडपट्टीमध्ये मोलमजुरी करणारा अशी समाजाची अवस्था आहे.