शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

पहाडावरील कुंभेझरीची शाळाच वेगळी... !

By admin | Updated: August 18, 2014 23:23 IST

कॉन्व्हेटच्या संस्कृतीत मागील काही वर्षांमध्ये जिल्हा परिषदेचा दर्जा घसरत असल्याची ओरड आहे. मराठी शाळांकडे शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांनीही काहीशी पाठ फिरविली आहे.

साईनाथ कुचनकार - चंद्रपूरकॉन्व्हेटच्या संस्कृतीत मागील काही वर्षांमध्ये जिल्हा परिषदेचा दर्जा घसरत असल्याची ओरड आहे. मराठी शाळांकडे शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांनीही काहीशी पाठ फिरविली आहे. या शाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आणि सोयीसुविधा पुरविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र पालकांचे मन मराठी शाळांकडे वळविण्यात पाहिजे तसे यश आजही आले नाही. मात्र अतिदुर्गम आणि पहाडावर असलेल्या जिवती तालुक्यापासून १२ कि.मी.वर असलेल्या कुंभेझरी येथील जिल्हा परिषद शाळेची किमया काही वेगळीच आहे. शहरी भागाच्या तुलनेत येथील विद्यार्थी गुणवत्तेत आजही कमी नाही.जिवती येथून बारा कि.मी. अंतरावर असलेल्या कुंभेझरी हा परिसरात अतिदुर्गम आणि पहाडावरील भाग म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी जाण्यासाठी आजही व्यवस्थित रस्ता नाही. मात्र येथील जिल्हा परिषद शाळेची चकाकी काही औरच आहे. शहरी भागातील शाळांही एकवेळ लाजेल, अशी किमया या शाळेने साधली आहे. केवळ इमारतच नाही तर, तेथील प्रत्येक गोष्ट आल्हाददायक आहे. विद्यार्थी दररोज हसत-हसत शाळेत येतात. यासाठी शाळेतील वातावरण तसे तयार करण्यात आले आहे. शाळेतील बाह्य परिसर स्वच्छ आहे. फुलझांडांनी सुशोभित करण्यात आला आहे. भिंतीवर सुंदर घोषवाक्य लिहिलेली आहे. शाळा परिसरात मुलांसाठी अनेक प्रकारची खेळणी आहे. शाळेत ओपन डायनिंग हॉलसुद्धा बनविण्यात आला आहे. मोकळ्या परिसरात कडप्प्यांच्या सहाय्याने जेवणाचे टेबल व बाकांची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना हात व ताट धुण्यासाठी स्वतंत्र ओटे तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, येथील पाण्याचा उपयोगही झाडांसाठी करण्यात आला आहे. वर्गखोल्यांमध्येही वातावरण अभ्यासासाठी पोषक आहे. बोलक्या भिंती वर्गखोल्याचे आकर्षण आहे. या सर्व साहित्याचा वापर येथील शिक्षक विद्यार्थी घडविण्यासाठी पुरेपूर करीत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील इतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता, उपस्थितीसाठी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांसह इतर अधिकारी चिंता व्यक्त करीत असताना या शाळेतील उपस्थितीही वाखाण्याजोगी आहे. येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शरदचंद्र पाटील यांनी या शाळेला नुकतीच भेट दिली असून पाहणी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची माहिती घेतली.