शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णनगरवासीय स्वत:च क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST

चंद्रपुरातील बंगाली कॅम्प चौक शहरातील मोठा चौक मानला जातो. कामगारांचे जंक्शन असलेल्या या चौकात दिवसभर वर्दळ असते. आजुबाजुच्या अनेक वस्त्यांसाठी हा चौक एक बाजारपेठ आहे. या चौकाच्या पलिकडे कृष्णनगर ही गजबजलेली वस्ती आहे. या वस्तीतच पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे शनिवारी रात्रीच कृष्णनगर व आजुबाजुच्या परिसरातील नागरिकांमध्ये माहित झाले.

ठळक मुद्देदिवसभर रुग्णाचीच चर्चा : पहिला रुग्ण आढळताच नागरिक धास्तावले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशभर कोरोनाचा हाहाकार माजला असताना मागील दीड महिन्यापासून कोरोनामुक्त राहिलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचा शिरकाव झाल्याचे निष्पन्न झाले. कृष्णनगरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर शनिवारी रात्रीपासून प्रशासनाने कृष्ण नगर सील केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून रात्रीच ही वार्ता जिल्हाभर पसरली. ज्या भागात कोरोना रुग्ण आढळला त्या कृष्णनगरात रविवारी सकाळपासूनच स्मशानशांतता पसरली होती. प्रशासनाने परिसर सील तर केलाच; मात्र धास्तावलेल्या नागरिकांनीही स्वत:लाच रविवारी लॉकडाऊन करून घेतले. त्यामुळे कृष्णनगरातील गल्लीबोळात पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांशिवाय कुणीही भटकताना आढळून आला नाही.चंद्रपुरातील बंगाली कॅम्प चौक शहरातील मोठा चौक मानला जातो. कामगारांचे जंक्शन असलेल्या या चौकात दिवसभर वर्दळ असते. आजुबाजुच्या अनेक वस्त्यांसाठी हा चौक एक बाजारपेठ आहे. या चौकाच्या पलिकडे कृष्णनगर ही गजबजलेली वस्ती आहे. या वस्तीतच पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे शनिवारी रात्रीच कृष्णनगर व आजुबाजुच्या परिसरातील नागरिकांमध्ये माहित झाले. त्यानंतर रात्रीच पोलीस व आरोग्य विभागाचे पथक कृष्णनगरात दाखल झाले. संपूर्ण कृष्णनगर, संजय नगर पोलीस प्रशासनाने सील केला. कोरोना रुग्ण आणि पोलिसांची ही कार्यवाही पाहून तेथील नागरिकही कमालीचे धास्तावले. सोमवारी सकाळपासून पुन्हा आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांची या परिसरात रेलचेल सुरू झाली. सोमवारी सकाळपासूनच नागरिक घराबाहेर पडले नाही.सात किमी परिसर बफर झोनकृष्णनगर, संजय नगर परिसरात कंटेनमेंट प्लन सुरू करण्यात आला आहे. यासोबतच या परिसराच्या बाहेरील सात किलोमीटर परिसरातील सर्व भाग बफर झोन म्हणून संबोधित करण्यात आला आहे. या ठिकाणीदेखील पुढील १४ दिवस ताप व आजाराबाबतची माहिती गोळा केली जाणार आहे.शिवाजीनगरातील नागरिकही घाबरलेशिवाजीनगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये सदर रुग्ण रात्रपाळीत चौकीदार म्हणून काम करत होता. त्यामुळे या परिसरातील नागरिकही घाबरले आहेत. या अपार्टमेंटबाबतची माहिती अनेकजण मोबाईलवरून जाणून घेताना दिसले.सदर रुग्ण रात्री १० ते सकाळी ६ या काळात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असायचा. अपार्टमेंटमध्ये राहणाºया सहा कुटुंबातील २८ लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. पाचव्या दिवशी या २८ नागरिकांचे नमुने घेण्यात येणार असून तपासणीला वैद्यकीय नियमानुसार पाठविण्यात येणार आहे.उपचार करणारे कर्मचारीही क्वारंटाईन२३ एप्रिलपासून कोरोना रुग्णाला ताप जाणवत होता. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. त्याला आयसोलेशन वार्डमध्ये विशेष निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या रुग्णावर उपचार करणाºया काही डॉक्टर व कर्मचाऱ्यांना होम क्वारंन्टाईन करण्यात आले आहे. सोबतच या रुग्णाच्या प्रवासाचा मागोवा घेतला जात आहे.एक वैद्यकीय चमू गेल्या पंधरा दिवसात हा रुग्ण कुठे कुठे गेला होता, या संदर्भातली चाचपणी करत आहे.कलेक्टर, एसपी धडकले कृष्णनगरातशनिवारी कृष्णनगरातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघताच रविवारी सकाळीच जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत हे कृष्णनगर परिसरात धडकले. त्यांनी परिसराची पाहणी केली. सदर परिसराची लोकसंख्या किती, परिसर दाट वस्तीचा आहे की विरळ, दुकानांची संख्या किती आदी सर्व गोष्टीचा त्यांनी आढावा घेतला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या