कुणाल उंदीरवाडे
: ज्ञानेश महाविद्यालयात पदवीदान समारंभ
नवरगाव : पदवीनंतर खऱ्या अर्थाने अनेक वाटा निर्माण होतात. या काळात ठरवून करिअरसंदर्भात निश्चित पाऊल उचलले पाहिजे. आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर माहिती आणि ज्ञान यात फरक करता आला पाहिजे. नेमकेपणाने अभ्यास करून संपादित केलेले ज्ञान यशापर्यंत नक्कीच पोहचवते, असे प्रतिपादन सिंदेवाही पंचायत समितीचे संवर्ग विकास आधिकारी कुणाल उंदीरवाडे यांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. सुरेश बाकरे होते. या कार्यक्रमात कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी गोंडवाना विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखेतील प्रथम आलेला श्री ज्ञानेश महाविद्यालयाचा विद्यार्थी वैभव पटवारी मोहुर्ले यानेही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन डाॅ. आस्तिक मुंगमोडे यांनी केले तर आभार डाॅ. उमेश इंदुरकर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.