शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटका एम्टा कोळसा खाण बंद

By admin | Updated: September 22, 2014 23:15 IST

विभागीय कामगार आयुक्त नागपूर यांनी बोलाविलेल्या कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटनांच्या बैठकीत चर्चा फिस्कटल्याने अखेर येथील कार्यरत कामगार संघटनांनी सोमवार

भद्रावती : विभागीय कामगार आयुक्त नागपूर यांनी बोलाविलेल्या कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटनांच्या बैठकीत चर्चा फिस्कटल्याने अखेर येथील कार्यरत कामगार संघटनांनी सोमवार (दि. २२) पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे खाण बंद पडून कर्नाटका एम्टाचे कोट्यवधीचे नुकसान होत आहे. ३१ आॅक्टोबर २०१४ ला कामगार आणि कंपनी यांच्यातील जुना करार संपुष्टात आल्यानंतर खाणीत कार्यरत असलेल्या कोयला मजदूर काँग्रेस (इंटक) व राष्ट्रीय कोयला कामगार संघ या दोन्ही कोळसा कामगार संघटनांनी एकत्रित येऊन कामगार विषयीचा नव्या कराराचा प्रस्ताव कंपनीला सादर केला. त्यावर कंपनीने खाणीतील कामगारांना वेठीस धरण्याचे काम सुरू केले. त्यात खाण परिसरातील कॅन्टींग बंद करण्यात आली व २५ डंफर आॅपरेटरच्या बदल्या अन्य राज्यात करण्यात आल्या. त्यानंतर संघटना व व्यवस्थापनामध्ये अनेकदा चर्चा झाली. मात्र त्यात कोणताही तोडगा न निघाल्याने उभय पक्षात तणावाचे वातावरण निर्माण होत गेले. ३, १० व १२ सप्टेंबरला विभागीय कामगार आयुक्तांनी कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापनाच्या बैठका बोलाविल्या व त्यात तडजोड घडवून आणण्याचे प्रयत्न केले. मात्र यात वाटाघाटी फिस्कटल्याने कामगार संघटनांनी कंपनी व्यवस्थापनाला तीन दिवसाचा अल्टीमेटम देत अखेर आजपासून बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरूवात केली. यासंदर्भात आपण आज सायंकाळी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे इंटक नेते एस.क्यु. जामा यांनी सांगितले तर राष्ट्रीय कोयला कामगार संघाचे नेते प्रमोद मोहोड यांनी सांगितले की सर्व कामगारांनी एकत्रित येऊन आपल्या रास्त मागण्या मान्य करण्यासाठी एकजूट होऊन शांततेने कंपनी विरोधात लढण्याचे आवाहन केले. याप्रसंगी माजरी क्षेत्राचे इंटक नेते धनंजय गुंडावार, संजय दुबे उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)