शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कारगीलच्या आठवणी रोमांच उभे करतात...

By admin | Updated: July 26, 2015 01:36 IST

‘सर्व बाजूंनी पसरलेला बर्फ, प्रतिकूल हवामान, उंचावरुन होत असलेला शत्रूचा मारा आणि या साऱ्याला तोंड देत प्रखर देशभक्तीने ओतप्रोत भरलेले भारतीय सैनिक. ..

चंद्रपूर : ‘सर्व बाजूंनी पसरलेला बर्फ, प्रतिकूल हवामान, उंचावरुन होत असलेला शत्रूचा मारा आणि या साऱ्याला तोंड देत प्रखर देशभक्तीने ओतप्रोत भरलेले भारतीय सैनिक. शत्रूला या भूमीवर पायही ठेवू द्यायचा नाही, या निर्धाराने पुढे सरसावतात, एकक ठाणं काबीज करत विजयी होतात, हे दृश्य आजही आठवते आणि त्या साऱ्या आठवणी अंगावर रोमांच उभे करतात, देशासाठी सर्वस्व बहाल करण्याची उर्मी वारंवार जागी करतात’ सन्मित्र सैनिकी विद्यालयाचे सैनिकी प्रशिक्षक तथा मुख्य प्रशिक्षण अधिकारी कमलसिंग थापा बोलत होते. बोलताना त्यांच्या शब्दातून कारगिल युद्धाचा थरार स्पष्ट जाणवत होता. २६ जुलै रोजी कारगील दिन आहे. या निमित्ताने प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली. यावेळी युध्दातील थरारक आठवणींना या योध्दांनी उजाळा दिला.१९९९ च्या कारगील युद्धात प्रत्यक्ष सहभागी असलेले कमलसिंग थापा युद्धाच्या आठवणी सांगताना म्हणाले, ‘मी त्यावेळी नायब सुभेदार होतो. पॉईट ४८७५ वर चढाई करण्याचा आम्हाला आदेश मिळाला. शत्रूसैन्य सतत फायरिंग करत होते. त्यांना तसेच प्रत्यूत्तर देत आम्ही चढाई करत होतो. उंचावरुन लढणे त्यांना जेवढे सोपे तेवढेच आम्हाला कठीण होते. पण अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत आम्ही शत्रूला परास्त केले व ती जागा सर केली. या लढाईत प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी मिळणे हे मी माझे सौभाग्य समजतो.’कमलसिंग थापा हे मूळचे हिमाचल प्रदेशचे असून सैन्यातून निवृत्त झाल्यावरही देशसेवेचे माध्यम म्हणून येथील सन्मित्र सैनिकी विद्यालयात सैनिकी प्रशिक्षक या पदावर ते रुजू झाले. भारतीय वायुसेनेतून निवृत्त झालेले दीपक भोयर हेसुद्धा सन्मित्र सैनिकी विद्यालयात सैनिकी प्रशिक्षण म्हणून कार्यरत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातले ब्रह्मपुरी हे त्यांचे मूळ गाव. कारगील युद्धप्रसंगी त्यांची श्रीनगर येथे नेमणूक होती. लढाऊ विमानांची निगा राखणे, काळजी घेणे व लढाईच्या दृष्टीने लढाऊ विमानांची सिद्धता करणे ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. वायुदलाची या युद्धात महत्त्वाची भूमिका होती. अत्यंत जोखमीची ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. या युद्धात सामील होता आले, याचे त्यांनाही समाधान वाटते. युद्धाच्या वेळी वायुसेनेत ते सार्जंट या पदावर कार्यरत होते.दीपक भोयर व कमलसिंग थापा दोघांनीही निवृत्तीनंतर देशसेवा करता यावी म्हणून सन्मित्र सैनिकी विद्यालयात सैनिकी प्रशिक्षक म्हणून कार्य करणे पसंत केले. उद्याचे सैनिक घडवताना दोघांनाही समाधान वाटते. विद्यार्थ्यांनीही त्यांच्याप्रमाणे सैनिक व्हावे, अशी दोघांचीही भावना असून त्या दृष्टीने विद्यार्थी परिपूर्ण व्हावेत, यासाठी ते प्रशिक्षण देत असतात. विद्यार्थी जेव्हा त्यांचे सैन्यातले व युद्धाचे अनुभव ऐकतात, तेव्हा रोमांचित होतात व त्यांच्यासारखे व्हायचे, हे मनोमन ठरवतात. कमलसिंग थापा यांना मिळालेली शौर्यपदके पाहताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव त्यांना सार्थकतेचे समाधान देतात. विद्यार्थ्यांचा उत्साह त्यांना नवी उमेद देतो व हे विद्यार्थी नक्कीच आपल्यासारखे कार्य करतील, असा दोघांनाही विश्वास वाटतो.( प्रतिनिधी)