शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

फ्लॅय अ‍ॅश वाहून नेणारे लोखंडी पाईप चोरणारा जेरबंद

By admin | Updated: December 30, 2014 23:31 IST

चंद्रपूर वीज केंद्रातून आवळा- कचराळा गावात प्लॉयअ‍ॅश वाहून नेणारी लोखंडी पाईपलाईन आहे. ही पाईपलाईन काही चोरट्यांनी चोरुन मेटॅडोरने वाहून नेत असताना पाईपसह चालकाला भद्रावती

भद्रावती : चंद्रपूर वीज केंद्रातून आवळा- कचराळा गावात प्लॉयअ‍ॅश वाहून नेणारी लोखंडी पाईपलाईन आहे. ही पाईपलाईन काही चोरट्यांनी चोरुन मेटॅडोरने वाहून नेत असताना पाईपसह चालकाला भद्रावती पोलिसांनी अटक केली. ही कारवाई कचराळा भागात सोमवारच्या रात्री केली.गेल्या कित्येक दिवसांपासून चंद्रपूर वीज केंद्रात कोळसा घोटाळा गाजत असताना याच परिसरातील कचराळा नाल्यातून रेतीची तस्करी होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. रेती चोरीकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष असले तरी पोलिसांनी मात्र यावर अंकुश लावला. रात्री गस्तीवर असताना पोलिसांनी एम.एच. २६ बी ४२२२, ४०७ क्रमांकाचा मेटॅडोर अडविला. यात वीज केंद्रातील फ्लॅय अ‍ॅश वाहून नेणारे ६० मिटर लांबीचे लोखंडी पाईप आढळून आले. या पाईपची अंदाजे किंमत ६० हजार रुपये आहे. पोलिसांनी पाईप ताब्यात घेऊन चालकाला अटक केली. यामध्ये पुन्हा सहा ते सात आरोपी असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी फ्लॅय अ‍ॅश वाहून नेणारे लोखंडी पाईप चोरी गेल्याबाबत सेक्युर्टी प्रबंधक मजीतसिंह दयाशंकर सिंग यांनी भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली होती. ही कारवाई एपीआय डब्ल्यू. एच. हेमणे यांनी केली. आरोपीवर ३७९ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे. (शहर प्रतिनिधी)