शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या दहशतीत शिक्षणाचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 00:36 IST

तालुक्यातील दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या ३० गावात दर पंधरा दिवसांनी वाघाच्या हल्ल्यात जनावरे, माणसे मारली जात आहेत. जखमी होत आहेत. त्यामुळे गावागावामध्ये वाघाचे दहशत पसरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : तालुक्यातील दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या ३० गावात दर पंधरा दिवसांनी वाघाच्या हल्ल्यात जनावरे, माणसे मारली जात आहेत. जखमी होत आहेत. त्यामुळे गावागावामध्ये वाघाचे दहशत पसरली आहे. या परिस्थितीत पद्मापूर येथील पाचवी ते सातवी या वर्गातील २३ विद्यार्थ्यांना घनदाट जंगलातून तीन किमी अंतरावरील भूज येथील शाळेत पाय जावे लागत आहे. वाघाच्या दहशतीत ते शिक्षणाची वारी करीत आहे.पद्मापूर-भूज गट ग्रामपंचायत आहे. पद्मापूरची लोकसंख्या ६८० आहे. या गावात वर्ग पहिली ते चवथीपर्यंतची जिल्हा परिषद शाळा अस्तित्वात आहे. मात्र इयत्ता पाचवीपासून पुढील शिक्षणासाठी तीन किमी अंतरावर असलेल्या भूज येथील शाळेत जावे लागते. पद्मापूर-भूज या मार्गावर अनेकदा सकाळी आणि सायंकाळी सातत्याने पट्टेदार वाघाचे दर्शन होते. त्यामुळे पाल्यांना शाळेत पाठविण्यास पालक धजावत नाही. त्यामुळे २२० दिवसांपैकी जवळपास १०० दिवसांची शाळा बुडते. रात्री गावात पोहोचायला विद्यार्थ्यांना उशीर व्हायला नको, यासाठी अंधार पडायच्या आत ४ वाजताच शाळेला सुटी दिली जाते. यामुळे त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर याचा परिणाम होत आहे. काही दिवसांपूर्वी पद्मापूर येथे पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात शेतावर काम करीत असलेल्या एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. १८ फेब्रुवारीला सकाळी ७ ते ८ वाजताच्या सुमारास पद्मापूर-भूज मार्गावर वाघाने तळ ठोकला होता. त्यामुळे विद्यार्थी शाळेतच जाऊ शकले नाहीत.१ मार्चपासून जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात सुरू राहणार आहे. सकाळच्या सुमारास या मार्गावर पट्टेदार वाघाचे हमखास दर्शन होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समोरील अडचणी आणखी वाढणार आहेत. मानव विकास मिशनअंतर्गत बस उपलब्ध आहे. परंतु तिची आणि शाळेची वेळ जुळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करीतच शाळेत जावे लागते.

टॅग्स :Tigerवाघ