शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

‘जय कन्हैय्या लाल की’ जयघोषाने चंद्रपूर निनादले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2015 01:15 IST

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मंगल दिवशी चंद्रपूरच्या श्री महर्षी विद्यामंदिराच्यावतीने शोभायात्रेचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या ‘हाथी घोडा पालकी जय कन्हैय्या लाल की’ ...

शोभायात्रा : चंद्रपुरातील महर्षी विद्यामंदिराचे आयोजनचंद्रपूर : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मंगल दिवशी चंद्रपूरच्या श्री महर्षी विद्यामंदिराच्यावतीने शोभायात्रेचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या ‘हाथी घोडा पालकी जय कन्हैय्या लाल की’ अशा घोषणांनी संपूर्ण चंद्रपूर शहर निनादले.कार्यक्रमाची सुरुवात श्री महर्षी विद्या मंदिरच्या सिव्हिल लाईन शाखेतील कार्यक्रमाने झाली. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ महेंद्र कल्याणकर, चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर राखी कंचर्लावार तसेच सीसीडीएम डिव्हीजन चंद्रपूर एक्झीक्युटीव इंजिनियर अर्चना घोडेस्वार हे होते.प्रमुख अतिथी तसेच गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गिरीश चांडक तसेच सदस्य मंडळ यांच्या हस्ते बाळकृष्णाच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून पूजा करण्यात आली. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यांच्यात दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली. ज्यात मुलांचा संघ विजयी झाला.गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गिरीश चांडक यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमानंतर प्रमुख अतिथींनी नारळफोडून शोभायात्रेचा शुभारंभ केला. शोभायात्रेत श्रीकृष्णाच्या कार्यावर आधारीत देखावे ठेवण्यात आले होते. या शोभायात्रेचे शहरातील स्वामीनारायण मंदिर, गांधी चौक, लक्ष्मीनारायण मंदिर, जयंत टॉकीज आदी ठिकाणी स्वागत करण्यात आले. भाविकांनी श्रीकृष्ण कन्हैयाचे पूजन केले. स्वागतासाठी निरनिराळ्या ठिकाणी कमानी उभारण्यात आल्या होत्या.राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार नाना शामकुळे, डॉ. सुशिल मुंधडा, राजीव गांधी कॉलेजचे संचालक मतीन शेख, लोकमत समाचारचे अरुण सहाय, भाजपा युवा कार्यकर्ता सुभाष कासनगोट्टुवार, पंकज शर्मा, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर यांनी पूजन केले. शोभायात्रेत गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गिरीश चांडक, उपाध्यक्ष अनुपम चिलके, सचिव दत्तात्रेय कंचर्लावार, कोषाध्यक्ष अर्चन पोपट, सदस्य उमेश चांडक, अल्का चांडक आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)