शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयाचे मूल्यांकन करणे आवश्यक

By admin | Updated: September 3, 2016 00:35 IST

महाविद्यालयाचे मूल्यांकन करणे आज आवश्यक झाले आहे.

गणेश हेगडे : नागभीड येथे नॅकचा एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादनागभीड : महाविद्यालयाचे मूल्यांकन करणे आज आवश्यक झाले आहे. त्याकरिता महाविद्यालयास कोणत्या -- जावे लागणार याबाबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन पाठपुरावा करावा लागेल, असे नॅकचे राष्ट्रीय सहसल्लागार डॉ.गणेश हेगडे यांनी सांगितले.नागभीड (निसर्गायन) येथे ‘रिसेंट मथडालॉजी आॅफ इन्स्टिट्युटशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रिडिटेशन बॉय नॅक’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद झाला.भारतातील महाविद्यालयाचा दर्जा ठरविण्याकरिता स्वायत्त संस्था म्हणून नॅक (नॅशनल असेसमेंट अ‍ॅक्रिडिटेशन कौन्सिल) बंगलोरची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या राष्ट्रीय सहसल्लागार या पदावर कार्यरत व नॅकच्या कार्यप्रणालीचा प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. गणेश हेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसंवादाचे आयोजन राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय नागभीड, मोहसिनभाई जव्हेरी महाविद्यालय, देसाईगंज ग्रामगीता महाविद्यालय चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.या परिसंवादाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एन.व्ही. कल्याणकर यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्ष म्हणून मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ आरमोरीचे अध्यक्ष किशोर वनमाळी होते. तसेच ईस्माईल जव्हेरी प्राचार्य डॉ. नानासाहेब भडांगे, माजी अधिष्ठाता, विज्ञान शाखा तथा प्राचार्य पुंडलिकराव गवळी महाविद्यालय, शिरपूर जैन व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे प्राचार्य फोरमचे अध्यक्ष डॉ.एन.एस. कोकोडे, स्वामी रामानंदतूर्थ विद्यापीठ नांदेडच्या प्राचार्य फोरमचे अध्ंयक्ष तथा परभणी येथील शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब जाधव आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक डॉ.अनिल कोरपेनवार, डॉ.सुरेश रेवतकर व डॉ.अमीर धम्मानी यांची उपस्थिती होती.एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे प्रमुख वक्ते डॉ. गणेश हेगडे यांनी दोन सत्रामध्ये मार्गदर्शन केले. पहिल्या सत्रात उच्च शिक्षणातील अध्ययन अध्यापनाचे मूल्यमापण करून प्राध्यापकांची संशोधन प्रवृत्ती वाढीस लावणे आणि पायाभूत सुविधा शिक्षण संसाधन याचा विकास करून प्रशासनात नेतृत्वाचा तसेच गुणवत्ता निर्देशांक मार्गदर्शक तत्वे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तर दुसऱ्या सत्रात आय.क्यू.ए.सी. चा आराखडा कसा असावा, हे सांगितले.परिसंवादाकरिता प्राप्त झालेल्या शोधलेखाचे प्रकाशन कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)