शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीची सरकारविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी

By admin | Updated: March 5, 2016 00:56 IST

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींकडे सरकारने फिरविलेली पाठ, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीकडे होत असलेले दुर्लक्ष, ...

शासनाला पाठविला ठराव : शेतकऱ्यांना कर्जातून तत्काळ मुक्त कराचंद्रपूर : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींकडे सरकारने फिरविलेली पाठ, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीकडे होत असलेले दुर्लक्ष, वाढलेल्या आत्महत्या, नापिकीमुळे ग्रामीण भागात आलेले दारिद््रय अशा विविध प्रश्नांसाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.या अंतर्गत शेतकऱ्यांची कर्जातून संपूर्ण मुक्तता करणे, शेती व्यवसाय आणि शेतकऱ्यांना संरक्षण देणे, ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना पोशिंदा म्हणून उदरनिवारहासाठी दरमहा पाच हजार रूपये पेन्शन मिळणे, स्वामिनाथ आयोगाच्या शिफारशी लागू करणे आदी प्रश्नांसाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. शेतमजूर कृती समिती महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने किशोर माथनकर आणि शंकर धोंडगे हे शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. या याचिकेसाठी आवश्यक असलेले प्रपत्र पक्षाच्या सर्व तालुका अध्यक्षांकडे आणि प्रमुख पदाधिकाऱ्याकडे उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी या प्रपत्रांवर आपले नाव आणि पत्ता लिहून ते न्यायालयाच्या खंडपीठाकडे पाठवून हा लढा सामूहिक करावा, अशी विनंती जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी केली आहे. जिल्ह्यातील धान उत्पादकांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसने सातत्याने भूमिका मांडली आहे. त्यासाठी आंदोलने करून आणि मोर्चे काढून कसलीही दखल होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्या नेतृत्वात पक्षाने जिल्ह्यात हे पाऊल उचलले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने २६ नोव्हेंबरला सावलीतील विश्वशांती विद्यालयाच्या मैदानावर शेतकरी परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत ठराव करून शासनाला पाठविण्यात आला होता. त्यानंतरही प्रश्न न सुटल्याने ३ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा नेण्यात आला होता. मात्र सरकारने निर्णय न घेतल्याने न्यायालयात दाद मागणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)