शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आॅक्सिजनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 23:16 IST

चंद्रपूर जिल्हा सध्या तीव्र पाणी टंचाईच्या सावटात आहे. जून महिना आता संपायला आला आहे. मात्र पावसाचा पत्ता नाही. जिल्ह्यातील सर्व अकराही सिंचन प्रकल्प सध्या आॅक्सीजनवर आहेत. अकरापैकी चंदई व नलेश्वर हे प्रकल्प कोरडे पडले आहे. चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई प्रकल्पातही २८.५० टक्के जलसाठा आहे. उर्वरित आठ प्रकल्पात १५ टक्क्याहून कमी पाणी आहे. जुलै महिन्यात दमदार पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांचा खरीप हंगाम मोठ्या संकटात सापडणार आहे.

ठळक मुद्देचंदई, नलेश्वर प्रकल्प कोरडे : उर्वरित प्रकल्पातही १५ टक्क्यांहून कमी जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा सध्या तीव्र पाणी टंचाईच्या सावटात आहे. जून महिना आता संपायला आला आहे. मात्र पावसाचा पत्ता नाही. जिल्ह्यातील सर्व अकराही सिंचन प्रकल्प सध्या आॅक्सीजनवर आहेत. अकरापैकी चंदई व नलेश्वर हे प्रकल्प कोरडे पडले आहे. चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई प्रकल्पातही २८.५० टक्के जलसाठा आहे. उर्वरित आठ प्रकल्पात १५ टक्क्याहून कमी पाणी आहे. जुलै महिन्यात दमदार पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांचा खरीप हंगाम मोठ्या संकटात सापडणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत फारच अल्प पाऊस पडला. त्यामुळे जलसाठ्या पाहिजे तसा पाण्याचा साठा होऊ शकला नाही. त्यानंतर मार्च महिन्याच्या दुसºया पंधरवाड्यापासून जूनच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत जिल्ह्यात सूर्याने आग ओकली. पारा ४८ अंशापर्यंत पोहचला. या तीव्र उन्हामुळे जलसाठे झपाट्याने आटू लागले. मे महिन्यातच जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प चिंताजनक स्थितीत आले होते. केवळ इरई धरणात बºयापैकी जलसाठा होता. मात्र चंद्रपूर शहर व चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र यांना पाणी पुरविताना इरई धरणाचाही जलसाठा झपाट्याने कमी होऊ लागला. या प्रकल्पात आता केवळ २८.५० टक्के जलसाठा आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील चंदई व नलेश्वर सिंचन प्रकल्पात शून्य टक्के पाणी आहे. म्हणजेच या धरणात सध्या ठणठणाट आहे. अमलनाला धरणात ११.८३ टक्के, लभानसराड प्रकल्पात ६.२९ टक्के, पकडीगुड्डम प्रकल्पात ९.३६ टक्के, डोंगरगाव प्रकल्पात १४.१९ टक्के, घोडाझरी प्रकल्पात ७.४६ टक्के, चारगाव धरणात १५.५६ टक्के, लालनाला प्रकल्पात १५.०३ टक्के तर आसोलामेंढा प्रकल्पात २४.३८ टक्क़े जलसाठा आहे.आता शेतकरी खरीप हंगामाच्या कामाला लागला आहे. हंगामपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र शेतकºयांकडे सिंचनाचा अभाव आहे. ग्रामीण भागात पसरलेले मामा तलावांचे जाळे शेतकºयांसाठी वरदान आहेत. मात्र अत्यल्प पाऊस झाल्यामुळे मामा तलावातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. मामा तलावांची स्थिती चिंताजनक आहे.मामा तलावाची स्थितीही चिंताजनकचंद्रपूर जिल्ह्यात एकूण ९७ मामा तलाव आहेत. यात आसोलामेंढा नामक मोठा तलाव आहे. आठ मध्यम मामा तलाव आहेत. तर ८८ लघू मामा तलाव आहेत. मोठ्या तलावात ४१.७२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आठ मध्यम तलावात ३५ टक्के जलसाठा आहे तर उर्वरित ८८ लघू मामा तलावात केवळ १८ टक्के पाणी शिल्लक आहे.