शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

मनपातील 200 कोटींच्या अनियमिततेची चौकशी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 05:00 IST

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे  मंगळवारी चंद्रपुरात आले असता या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधून दोषींवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नगरसेवकांनी रेटून धरली. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठित करून सत्य बाहेर काढणार असल्याचे सांगितले. 

ठळक मुद्देकाँग्रेस आक्रमक : विजय वडेट्टीवार यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिकेच्या २०१५-१६ या वित्तीय वर्षातील लेखापरीक्षण अहवालात १५ कामांमध्ये सुमारे २०० कोटींची अनियमितता आणि ७९ बाबींवर गंभीर आक्षेप घेतल्याने कारवाईसाठी काँग्रेसचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे  मंगळवारी चंद्रपुरात आले असता या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधून दोषींवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नगरसेवकांनी रेटून धरली. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठित करून सत्य बाहेर काढणार असल्याचे सांगितले. लेखापरीक्षण अहवाल मंजूर करण्यासाठी मनपाने ३१ जुलै २०२१ रोजी  ऑनलाईन सर्वसाधारण सभेपुढे हा विषय ठेवला होता. दरम्यान तत्कालीन महापौर व पदाधिकाऱ्यांच्या अनियमिततेमुळे मनपाचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा आरोप करून काँग्रेसच्या नगरसेवकांनी गदारोळ केला होता. वित्तीय वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालात एकूण १५ कामांमध्ये अनियमितता आणि ७९ बाबींवर गंभीर आक्षेप असल्याचा मुद्दा काँग्रेसचे गटनेता डॉ. सुरेश महाकुलकर, नगरसेवक नंदू नागरकर, देवेंद्र बेले, सुनीता लोढीया आदींनी सभेत नोंदविला होता. याशिवाय कल्पना लहानगे, संगीता भोयर, ललिता रेवल्लीवार, विना खनके, सकीना अन्सारी, अशोक नागापुरे, अली अहमद मन्सुर, नीलेश खोब्रागडे, कुशल पुगलिया, पप्पू देशमुख आदींसह मनपासमोर निदर्शने करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे चंद्रपुरात आले असता नंदू नागरकर, सुनिता लोढीया यांच्यासह अन्य नगरसेवकांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले. त्यामुळे   लेखापरीक्षण अहवालातील १५ कामांमधील २०० कोटींची अनियमितता पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

दोषींकडून वसुली करण्याचा तगादालेखापरीक्षणात दाखविण्यात आलेले वसूलपात्र ३० कोटी ३९ लाख २३ हजार ९९३ रक्कम सन २०१५-१६ च्या कालावधीतील पदाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करण्याचा मुद्दा कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे काही नगरसेवकांनी रितसर तक्रार केली.

काय आहे काँग्रेस नगरसेवकांच्या निवेदनात ?

मनपाच्या ७१ कामांवर नियमबाह्य खर्च करण्यात आला. आक्षेपाधीन २०० कोटी ३३ लाख ७९ हजार ४६९ हजारांपैकी वसूलपात्र ३० कोटी ३९ लाख २३ हजार ९९३ रुपये लेखापरीक्षणात दाखविण्यात आले. लेखा विभागाने यावर आक्षेप नोंदविला आहे. त्यामुळे ही अत्यंत गंभीर बाब असून सन २०१५-१६ मध्ये मनपाचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे दोषींवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे निवेदनातून केली आहे.  

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMuncipal Corporationनगर पालिका