शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधी सभागृहात पार पडल्या इच्छुकांच्या मुलाखती

By admin | Updated: March 29, 2017 01:48 IST

मनपा निवडणुकीसाठी सोमवारपासून नामांकन दाखल करण्याची आॅनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे.

१७ प्रभागासाठी दोन गटात निरीक्षकांनी घेतली उमेदवाराची परीक्षा चंद्रपूर : मनपा निवडणुकीसाठी सोमवारपासून नामांकन दाखल करण्याची आॅनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. काँग्रेस पक्षाने १७ प्रभागातील ६६ उमेदवार निवडण्यासाठी येथील राजीव गांधी सभागृहात मंगळवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यासाठी पक्षाच्या निरीक्षकांनी १७ प्रभागासाठी दोन गटात उमेदवारांची परीक्षा घेतली. काँग्रेसचे येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून आलेले माजी मंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया, डॉ.वजाहत मिर्झा, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, नंदू नागरकर, गजानन गावंडे, युवा नेते राहूल पुगलिय यांनी प्रभाग क्रमांक ९ ते १७ मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्याचप्रमाणे येथील प्रभाग क्रमांक १ ते ८ मधील इच्छुक उमेदवारांची परीक्षा गोंदियाचे आमदार व निरीक्षक गोपालदास अग्रवाल, नितीन कुंभलकर, किशोर जिचकार, जिया पटेल, गिरीश पांडव, शकुर नागाणी, प्रमोद तितरमारे, डॉ.आसावरी देवतळे यांच्या पॅनलने घेतली. आजच्या मुलाखतीसाठी काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांनी समर्थकांसह राजीव गांधी सभागृहात मोठी गर्दी केली. शेकडोवर इच्छुकांनी काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून निरीक्षकांना आर्जव केली. विद्यमान नगरसेवक उषा धांडे, सकीना अंसारी, मीना खनके, सुनिता लोढिया यांच्यासह प्रवीण पडवेकर, अशोक नागापूरे, प्रशांत दानव यांचा उमेदवारी मागणाऱ्यात समावेश होता. काही तरुण कार्यकर्त्यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून मुलाखतीला हजेरी लावली. (स्थानिक प्रतिनिधी) काँग्रेसची एकता कायम राहणार काय? अलीकडेच नगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. यामध्ये काँग्रेसची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली. राजुरा नगरपालिका वगळता अन्य ठिकाणी काँग्रेसला यश आले नाही. त्या निवडणुकीत काँग्रेसचे सुत्र ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या पॅनलकडे सोपविण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मानपानाचे नाटक घडले. आजच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखती काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात पार पडल्या. यावेळी सर्वच नेते गटतट विसरून एकाच ठिकाणी आले. अपवाद फक्त आमदार वडेट्टीवार यांचा होता. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत साऱ्यांनी काँग्रेसच्या विजयासाठी वज्रमुठ बांधली, तर सत्ताधारी पक्षाला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसची आजची एकता निवडणुकीपर्यंत कायम राहणार काय? असा प्रश्न मतदारात चर्चिला जात आहे.