शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी कामगारांवर अन्याय

By admin | Updated: March 8, 2016 00:51 IST

शासनाचा माथाडी कामगार कायदा १९६९ हा चंद्रपूरला सन २००४ मध्ये लागू झाला. या कायद्याची अंमलबजावणी वखार मंडळे, शासकीय गोदामे, सिमेंट गोदामे, रेल्वे माल धक्का या ठिकाणी चालू आहे.

कामावर घ्या : राष्ट्रीय कष्टकरी पंचायतीची मागणीचंद्रपूर : शासनाचा माथाडी कामगार कायदा १९६९ हा चंद्रपूरला सन २००४ मध्ये लागू झाला. या कायद्याची अंमलबजावणी वखार मंडळे, शासकीय गोदामे, सिमेंट गोदामे, रेल्वे माल धक्का या ठिकाणी चालू आहे. परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती व भात गिरण्यात या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. तिथे माथाडी कामगारांवर अन्यायच केला जात असल्याचा आरोप राष्ट्रीय कष्टकरी पंचायतीने केला आहे.मागील ११ वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती मूल येथील माथाडी नोंदीत कामगारांनी या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, याकरिता सतत मोर्चे, आंदोलने, उपोषण, धरणे आदी करुन शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शासनाने वारंवार प्रशासनाला या कायद्याची अंमलबजावणीचे आदेश व निर्देश दिले.काही लोकप्रतिनिधी यांनीसुद्धा अंमलबजावणी करा अन्यथा आंदोलन करु, असे स्पष्ट निर्देश दिले होते. परंतु सत्ता येताच त्यांनाही स्वत:च्या निर्वाचन क्षेत्रातील कष्टकरी कामगारांचा विसर पडला आहे. वारंवारच्या विनंतीची दखल घेऊन फक्त चार ओळींचे पत्र देऊन कामगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सुरू आहे. प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी अनेक सभा, बैठकीद्वारे अंमलबजावणीचे निर्देश दिले. त्यांच्याही आदेशाला न जुमानता बाजार समिती प्रशासनाने दखल घेतली नाही. याबाबत सूचित केले असता जिल्हाधिकारी दर बैठकीला एका आठवड्यात न्याय देण्याची कबुली देतात. त्यालाही सहा महिन्याचा काळ लोटतो. माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीच्या मागणीकरिता माथाडी कामगारांनी मरणांतक उपोषण केले असता ३१ जानेवारीपर्यंत अंमलबजावणी करण्यात येईल, अशी हमी देणारे तहसीलदार व माथडी मंडळ संप मिटताच बेजबाबदार झाले आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती मूलचे प्रशासक व सचिवांनी माथाडी कामगारांनाच कामावरुन बेदखल करुन नोंदीत नवीन कामगारांना कामावर लावून माथाडी कामगारावर उपासमारीची पाळी आणली आहे. या प्रकारे अधिकृत कामगारांना डावलून अनधिकृत कामगाराद्वारे शेतकऱ्यांची लूट करण्यात येत आहे. या माथाडी कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावे, माथाडी कामगारांना प्राधान्याने आधी कामे द्या, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. परंतु बाजार समिती प्रशासक, सचिवांनी याची अद्यापही दखल घेतली नाही. माथाडी कामगारांना काम देणारच नाही, अशी भूमिका घेतली आहे. पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी राष्ट्रीय कष्टकरी पंचायतीचे अध्यक्ष रमजान खान पठाण अशरफी यांनी केली आहे.