शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

चारगाव येथे पाहुण्या पक्ष्यांचे वास्तव्य

By admin | Updated: April 27, 2016 00:47 IST

वैश्विक तापमान (ग्लोबल वार्मिग) चा फटका चंद्रपूर जिल्ह्यालादेखील बसलेला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात वाढत्या तापमानाने कहर केलेला आहे.

संजय अगडे तळोधीवैश्विक तापमान (ग्लोबल वार्मिग) चा फटका चंद्रपूर जिल्ह्यालादेखील बसलेला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात वाढत्या तापमानाने कहर केलेला आहे. ४६ अंश तापमान पशुपक्ष्यांना असहनीय असते. चारगाव तळोळी (बा.) येथील तलावात भरपूर पाणी आहे. त्यामुळे अनेक पाहुण्या पक्ष्यांनी येथे आश्रय घेतला आहे.नवोदय विद्यालयातील शिक्षक पक्षी अभ्यासक निरीक्षक व्ही.के. पवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की हिवाळ्यात उत्तर भारतातून व विदेशातून अनेक पाहुणे पक्षी आपल्या परिसरात स्थलांतर करतात व चार ते पाच महिने वास्तव्य करुन फेब्रुवारीत परतीचा प्रवास आरंभ करतात. एप्रिल महिन्यांचे तापमान ४० अशांवर पोहचले असून काही पाहुण्या पक्ष्यांनी चारगाव, तळोधी (बा.) येथील तलावात आश्रय घेतला आहे. पवार यांनी केलेल्या निरीक्षणानुसार कॉम्बडकर (नकटा), रुडी रोल्फक (चक्रवाक), ब्लॅक हेडेड आयबिम (पांढरा शरारी), बॅक आयबिस (काळाशराटी), रिव्हर टर्न (नदीसुरथ) सारखे पक्षी उच्च तापमान सहन करु शकत नाहीत. परंतु या तलावात त्यांना आवश्यक असलेले खाद्य पानगवत, वनस्पती, पानकिडे व जलचर, छोटे मासे विपूल प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे रखरखत्या उन्हाळी पर्वा न करता ते येथे संचार करीत आहेत. आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात या पक्ष्यांचे आगमन झाले, तेव्हा ते पूर्णपणे वयस्क नसून आपल्या पालकांवर अवलंबून होते. सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांची पूर्णपणे वाढ झाली असून त्यांनी या परिसरातच आपले वास्तव्य केलेले आहे. सकाळी व सायंकाळी त्यांना उदरपोषण करताना पाण्यात मुक्त संचार करताना पाहता येते. दुपारी मात्र ते पाण्यात किंवा काठावर विश्रांती घेताना दृष्टीस पडतात. खरे तर दुपारच्या तीव्र उन्हात इतर पशुपक्षी व मानव कुणीही फिरताना दिसत नाहीेत. मात्र या पाहुण्या पक्ष्यांनी यावर मात केलेली दिसत आहे. पक्षी मित्र व अभ्यासकाकरिता ही जणू पर्वणीच म्हावी लागेल.