शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाची माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ

By admin | Updated: March 5, 2016 00:53 IST

भ्रष्टाचाराची प्रकरणे उजागर करण्याकरिता माहिती अधिकारातून माहिती मागण्याचा अधिकार नागरिकांना प्राप्त झाला. अर्ज केल्यानंतर ३० दिवसांत माहिती देणे अनिवार्य असतानाही ...

माहिती अधिकाराची अवहेलना : छायांकित प्रतीसाठी निधीच नसल्याचे कारणनवरगाव : भ्रष्टाचाराची प्रकरणे उजागर करण्याकरिता माहिती अधिकारातून माहिती मागण्याचा अधिकार नागरिकांना प्राप्त झाला. अर्ज केल्यानंतर ३० दिवसांत माहिती देणे अनिवार्य असतानाही सिंदेवाही पंचायत समितीच्या कृषी विभागाने ३० दिवस लोटूनही माहिती दिली नसल्याने माहिती अधिकाराची अवहेलना झाली आहे.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माहिती अधिकार कायद्यासाठी तीव्र लढा दिला. शासनस्तरावरून माहिती अधिकाराचा कायदा करण्यास भाग पाडले आणि माहिती अधिकाराचा कायदा २००५ मध्ये अंमलात आला. परंतु अनेक प्रशासकीय अधिकारी आपले पितळ उघडे पडू नये म्हणून माहिती दडविण्याचा प्रयत्न करतात. याचाच प्रत्यय सिंदेवाही पंचायत समितीच्या कृषी विभागाअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या बैलजोडीसंबधी सन २०१२ ते २०१५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या योजनेसंदर्भात टी.एस.पी., ओ.टी.एस.पी. व विशेष घटक योजनेअंतर्गत वाटप केलेल्या लाभार्थ्यांची यादी संदर्भात माहिती अधिकारात अमर बुध्दारपवार यांनी माहिती मागितली असता महिना लोटूनही माहिती देण्यात आली नाही. उलट कृषी अधिकारी यांनी जनमाहिती अधिकारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी यांना पत्र दिले. सदर माहितीच्या प्रती अंदाजे १९१० असुन याकरिता कृषी विभाग पं.स. सिंदेवाहीकडे छायांकित प्रती काढण्याकरिता आर्थिक तरतूद नसल्याचे पत्र दिले व त्याची प्रतिलिपी माहिती मागणारे अमर बुध्दापवार यांना देऊन माहिती अधिकाराची खिल्ली उडविली. त्याचप्रमाणे सदर माहिती विभागाच्या अधिकाऱ्याला प्रत्यक्ष भेट घेवून तुमच्याकडे निधी उपलब्ध नसल्याने लेखी पद्धतीनुसार लाभ दिलेल्या बैलजोडी लाभार्थ्यांची नोंद असलेल्या रजिस्टरच्या सत्यप्रती मागितल्या असता पुन्हा माहितीच्या अधिकाराचा अर्ज द्या व एका महिन्याने माहिती मिळेल, असा सल्ला देण्यात आला. त्यामुळे या विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच त्यांनी माहिती पुरविण्याबाबत दुसऱ्याचे पत्र माहिती मागणाऱ्याच्या लिफाफ्यात टाकून एवढे पैसे भरा असे पत्र देवून आपल्या कर्तव्य तत्परतेचा नमुना या विभागाने दिला. अशा पद्धतीने माहितीची लपवा-छपवी होत असल्याने बैलजोडी वाटपाचा गैरव्यवहार उघड होवू नये म्हणून हा खटाटोप केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. (वार्ताहर)